Apple चा आगामी iPhone 14 खूप चर्चेत आहे. नवीन iPhone सोबत कंपनी Apple Watch Series 8 देखील लॉंच करणार आहे. हे स्मार्टवॉच एडव्हान्स फीचर्ससह आणले जाईल. ताज्या अहवालानुसार, कंपनी प्रथमच आपल्या स्मार्टवॉचमध्ये ताप मोजण्याचं फीचर आणणार आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, नवीन ऍपल वॉचचा ताप तपासणारा सेन्सर युजर्सना त्यांच्या शरीराच्या तापमानाविषयी माहिती देईल. पण ते थर्मामीटर वापरण्याची आणि डॉक्टरांना भेट देण्याची देखील शिफारस करते. अहवालात असे म्हटले आहे की नवीन ऍपल वॉच थर्मामीटरप्रमाणे अचूक रीडिंग देणार नाही. पण युजर्सच्या शरीराचं तापमान वाढत आहे की नाही, हे देखील सांगणार आहे.

आणखी वाचा : Yamaha YZF R15 V3 स्पोर्ट्स बाईक आता रेसिंग ब्लूसह मॅट ब्लॅक कलरमध्ये, किंमत जाणून घ्या

आगामी Apple Watch Series 8 ला या वेळी रगड एडिशन देखील मिळू शकते, जे किंचित महाग असेल. रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की नवीन स्मार्टवॉच सीरिजमध्ये S8 चिपसेट असेल, ज्यामध्ये S7 प्रोसेसर प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स समाविष्ट असल्याचे सांगितले जाते.

Apple Watch Series 8 चा डिस्प्ले आकार सध्याच्या Apple Watch Series 7 प्रमाणे ठेवता येईल. कंपनी Apple Watch Series 3 ची विक्री देखील थांबवू शकते. यानंतर Apple Watch SE हे सर्वात स्वस्त स्मार्टवॉच राहील.