scorecardresearch

आधीच कोविड, त्यात चीनला बसू शकतो मोठा फटका; APPLE ‘या’ देशांमध्ये उत्पादन हलवणार असल्याची चर्चा

निर्मितीसाठी चीनवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी आयफोन निर्मिती कंपनी दीर्घकालीन योजनेवर काम करत असल्याचा खुलासा वॉल स्ट्रिट जर्नलने केला आहे.

आधीच कोविड, त्यात चीनला बसू शकतो मोठा फटका; APPLE ‘या’ देशांमध्ये उत्पादन हलवणार असल्याची चर्चा
Pic Credit-indianexpress

कोविडमुळे चीनमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आली आहेत. याबाबत तेथील जंता देखील संतापून आहे. अशात चीनला आर्थिक क्षेत्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निर्मितीसाठी चीनवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी आयफोन निर्मिती कंपनी दीर्घकालीन योजनेवर काम करत असल्याचा खुलासा वॉल स्ट्रिट जर्नलने केला आहे.

कोविडमुळे फटका

चीनमध्ये अशांतचेच्या मालिकांमुळे आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो मॅक्सचे उत्पादन प्रभावित झाले आहे. या पार्श्वभूमीवर हा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे, उत्पादनासाठी भारत आणि व्हिएतनाम यांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

(Vivo Y02 भारतात लाँच, 1TB पर्यंत वाढवू शकता इंटरनल स्टोअरेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

भारतामध्ये तीन उत्पादनकर्ता

भारतामध्ये आधीच फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन हे तीन उत्पादन भागीदार आहेत. तर व्हिएतनाममध्ये लक्सशेअर आणि इन्वेनटेक हे दोन उत्पादन भागीदार आहेत, जे एअरपॉड आणि होमपॉड बनवतात. भारतात ४० ते ४५ टक्के उत्पादन होऊ शकते असे अ‍ॅपलचे विश्लेषक मिंग ची कू यांचे मत होते. त्याचबरोबर, टाटा समूह देखील विस्ट्रॉनशी करार करण्यावर काम करत असल्याचे समोर आले होते. या सर्व बाबींमुळे भारतात अ‍ॅपलचे उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आजमितीस भारतात बनवलेले सुमारे ८० टक्के आयफोन देशांतर्गत बाजार पेठेसाठी वापरले जात आहेत. मिंग ची कू यांच्यानुसार, टाटाची विद्यमान अ‍ॅप कंपन्यांसोबतची भागीदारी गैर चीनी उत्पादनांच्या प्रमाणात वाढ करण्यास मदत करू शकते. परंतु, अहवालानुसार असे होण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. अहवालानुसार, प्रत्येक राज्यामध्ये भिन्न सरकार असते आणि कंपन्यांनी उत्पादने बनवण्याआधीच त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्यांचा भार टाकला जातो.

चीन हा अ‍ॅपलच्या कामकाजाचा अविभाज्य भाग

चीन हा अ‍ॅपलच्या कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अ‍ॅपलला चीनमधून बाहेर पडण्यासाठी कमीत कमी ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. अ‍ॅपलचे माजी ऑपरेशन मॅनेजर केट व्हाइटहेड यांनी, अ‍ॅपलच्या आवश्यकतेनुसार उत्पादन करणे हे सोपे काम नाही, असे अहवालात सांगितले आहे.

(२ काय, ३ वेळा चार्ज होऊ शकतो फोन, ‘या’ ‘POWER BANKS’ची किंमत २ हजारांच्याही खाली, पाहा यादी)

अ‍ॅपल विविध कारणांसाठी चीनवर अवलंबून

अ‍ॅपल विविध कारणांसाठी चीनवर अवलंबून आहे. राजकीय स्थिरता, मोठे मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ ही तीन कारणे आहेत. मात्र, कोविडमुळे अ‍ॅपलला फटका बसला आहे. वेडबुश सिक्युरिटीजचे अनॅलिस्ट डॅनिअल इव्ह यांच्यानुसार, चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या कोविडसंबंधी प्रतिबंधांमुळे अ‍ॅपलचे उत्पदन प्रभावित झाले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:14 IST

संबंधित बातम्या