Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लॉन्च करत असते. Apple ने त्यांची वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) २०२३ ची घोषणा केली आहे. हा Apple चा वार्षिक इव्हेंट आहे. या इव्हेंटची तारीख जाहीर झाली आहे. यंदाचा इव्हेंट नेहमीपेक्षा मोठा आणि नेत्रदीपक असेल असे Apple चे वर्ल्डवाईड डेव्हलपर्स रिलेशन्सचे उपाध्यक्ष सुसान प्रेस्कॉट यांनी सांगितले.

WWDC  मध्ये काय असणार खास ?

या इव्हेंटमध्ये iOS, macOS, iPadOS, watchOS आणि tvOS लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. तसेच Apple चा सर्वात खास असा iOS 17 लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये या वर्षी नवीन अपडेट आणि फिचर दिली जाणार आहेत.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी
India Vs Australia Test Series 2024 Schedule Announced
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ मैदानांवर खेळले जाणार पाच सामने

हेही वाचा : Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

यंदाचा WWDC इव्हेंट अतिशय खास असणार आहे. यावेळी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट लॉन्च केले जाऊ शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत बातम्या समोर येत आहे. कंपनीच्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट यावर्षी स्टार परफॉर्मर ठरू शकतो.

याशिवाय अहवाल सांगतो की, कंपनी नवीन मॅक हार्डवेअर लॉन्च करू शकते. Apple सिलिकॉन मॅक प्रो लॉन्च करू शकते. १५ इंचाचा मॅकबुक एअर यावर्षी Apple च्या इव्हेंटमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. Apple चा इव्हेंट WWDC २०२३ ५ जून २०२३ ते ९ जून २०२३ या कालावधीत होणार आहे.

हेही वाचा : UPI चार्जेसबाबत NPCI ने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “बँक किंवा ग्राहकांना…”

Google i/o २०२३ इव्हेंट

Google चा यंदाचा वार्षिक इव्हेंट हा Google I/O मे २०२३ या महिन्यात होणार असून गुगलने याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

कंपनीने Google I/O 2023 इव्हेंटचा पहिला टिझर म्हणून वेब पझलद्वारे कॉन्फरन्सची तारीख आणि स्थान जाहीर केले आहे. हे पझल सोडवले की लक्षात येते की, Google I/O 2023 इव्हेंट 10 मे रोजी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथील शोरलाइन अ‍ॅम्फीथिएटर येथे होणार आहे. यंदाच्या इव्हेंटमध्ये गुगल अनेक प्रॉडक्ट लॉन्च करू शकते अशी अपेक्षा आहे. इव्हेंटमध्ये Android 14 लॉन्च केले जाऊ शकते. Android 14 चे डेव्हलपर प्रिव्ह्यू Google ने आधीच रिलीझ केले आहे.