सध्याचे आपले गतीमान आयुष्य हे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवर अवलंबून आहे. जर हे उपग्रह नसतील तर आपण थेट १९५० च्या काळात मागे पोहचू, आपले दैनंदिन व्यवहार ठप्प होतील, विमानसेवा-दूरसंचार सेवा-टीव्हीचे विश्व अगदी ATM सेवाव अशा विविध गोष्टींवर त्याचा परिणाम थेट परिणाम होईल. त्यामुळे या उपग्रहांचा अस्तित्वाशी आपला प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्यांच्या सेवेवर आपले आयुष्य अवलंबून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे सांगायचे कारण पृथ्वीभोवती विविध कक्षांमध्ये फिरणाऱ्या उग्रहांसमोर अचानक एक संकट येऊन ठेपले होते. 2023 BU नावाचा एक लघुग्रह ( Asteroid ) हा पृथ्वीपासून अवघ्या तीन हजार ६०० किलोमीटर अंतरावरुन भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास दक्षिण अमेरिकेच्या आकाशातून पृथ्वीला वळसा घालत पुढे निघून गेला. या लघुग्रहाचा शोध हौशी खगोल अभ्यासक Gennadiy Borisov यांनी लावला होता. अवकाशाचे निरिक्षण करत असतांना साधारण सहा दिवसांपूर्वीच हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतांना त्यांना आढळून आले.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : विद्यार्थिनीवर कारमध्ये कोंबून सामूहिक बलात्कार, नागपूरमधील घटना; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

2023 BU लघुग्रह कसा होता

एका लहान स्कुलबसच्या आकाराचा, साधारण चार ते आठ मीटर अशा ओबडधोबड आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेशी समांतर साधारण ४०० दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता या लघुग्रहाने पृथ्वीला वळसा जरी घातला असता तरी यापुढच्या काळातही हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा… Google Policy: सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर गुगलने केले अँड्रॉइड पॉलिसीत बदल; वापरकर्त्यांना होणार फायदा , जाणून घ्या

पृथ्वीशी टक्कर झाली असती तर काय झाले असते?

हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याचं माहिती होताच जगभरातील विविध अवकाश संशोधन संस्थांनी, हौशी अभ्यासकांनी याचे तात्काळ निरिक्षण करायला सुरुवात केली आणि यापासून पृथ्वीला धोका नसल्याचे लगेच स्पष्टही झाले. या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर झाली असती तरी तो पृथ्वीभोवती असललेल्या वातावरणात घर्षणामुळे आकाशात जळून नष्ट झाला असता. कारण अभ्यासाअंती असं स्पष्ट झालं आहे की साधारण २५ मीटरपेक्षा जास्त आकाराचे लघुग्रह हे पृथ्वीवर थेट पोहचत नुकसान करु शकतात.

कृत्रिम उपग्रहांवर संकट

मात्र हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याने उपग्रहांना धोका निर्माण झाला होता. पृथ्वीभोवती कृत्रिम उपग्रह हे विविध कक्षांमध्ये विविध उंचीवर ( ३०० किलोमीटर ३६ हजार किलोमीटर ) अशा विस्तृत भागात फिरत आहेत. तेव्हा एखाद्या किंवा काही उपग्रहांशी टक्कर होण्याची शक्यता खूपच कमी होती. असं असतांनाही जर एखाद्या उपग्रहाशी टक्कर झाली असती तर अवकाश कचऱ्यात भर पडली असती, त्याचा इतर उपग्रहांना धोका निर्माण झाला असता, उपग्रह सेवा खंडीत होत नुकसान झाले असते ते वेगळंच.

मात्र कोणत्याही उपग्रहाला इजा न करता हा 2023 BU लघुग्रह पृथ्वीला वळसा घालत निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial satellites orbiting earth narrowly escapes collision with asteroid asteroid 2023 bu asj
First published on: 27-01-2023 at 10:30 IST