“पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षावर संपूर्ण फिरण्यास २४ तास लागतात. सोप्या शब्दांत सांगायचे, तर पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी मारण्यास २४ तास लागतात; ज्याला आपण एक दिवस, असेही म्हणतो. चंद्रासह इतर खगोलशास्त्रीय घटकांचा पृथ्वीच्या या परिभ्रमणावर खूप प्रभाव पडतो. दरम्यान, विस्कॉन्सिन-मॅडिसन (Wisconsin-Madison) विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे, “चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे, ज्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीवर होत आहे.”

शास्त्रज्ञांनी आता केलेल्या अंदाजानुसार, “१.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीने १८ तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग सातत्याने कमी होत आहे. चंद्र सध्या पृथ्वीपासून ३,८४,४०० किमी दूर आहे आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २७.३ दिवस लागतात. चंद्राच्या पृथ्वीशी होणाऱ्या या परस्परसंवादाचे (Earth’s interaction with the Moon) विश्लेषण करण्याच्या दृष्टीने ९० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या जुन्या खडकाचा अभ्यास करण्यात आला

हेही वाचा – दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र; ही दुर्मीळ खगोलीय घटना काय आहे?

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील भूविज्ञानाचे प्राध्यापक स्टीफन मेयर्स यांच्या म्हणण्यानुसार, “जसजसा चंद्र दूर जातो, तसतसा पृथ्वीचा वेग मंद होतो. सुमारे १.५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र इतका जवळ आला असता की, त्याच्या पृथ्वीशी असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या परस्परसंवादाने (interactions) चंद्राचे तुकडे तुकडे झाले असते.”

पण, चंद्र किमान ४.५ अब्ज वर्षे जुना आहे हे सर्वांना माहीत आहे. ही बाब हे सूचित करते की, हा अभ्यास पूर्णपणे योग्य नाही.

मेयर्स यांनी कोलंबिया येथील लॅमोंट संशोधन प्राध्यापक अल्बर्टो मालिनव्हर्नो यांच्या सहकार्याने, TimeOptMCMC विकसित केले. TimeOptMCMC जीओलॉजिकल रेकॉर्ड व्हेरिएशनचे (geological record variation) मूल्यांकन करण्याबाबतचा हा एक सांख्यिकीय दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामुळे त्यांना दिवसाची लांबी आणि चंद्र व पृथ्वी यांच्यामधील अंतर, तसेच त्यांच्यातील संबंध निर्धारित करण्यास मदत झाली.

हेही वाचा – एकेकाळी चंद्रावर होता धगधगता लाव्हारस? ‘चांद्रयान-३’ने उलगडली चंद्राची रहस्ये

अभ्यासानुसार, चंद्र वर्षाला ३.८२ सेंटिमीटर वेगाने दूर जात आहे आणि त्यामुळे आजपासून २०० दशलक्ष वर्षांनंतर पृथ्वीवर २५ तासांचे दिवस येऊ शकतात. शास्त्रज्ञ या फरकांना ‘मिलांकोविच चक्र’ (Milankovitch cycle), असे म्हणतात. पृथ्वीच्या फिरण्याची गती, हवामान यांवर, तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाश कसा पसरतो या बाबतीत चंद्राच्या मंद गतीचा खोलवर परिणाम होतो.

आताचा हा शोध नवीन नाही. कारण- १९८९ मध्ये रशियन शास्त्रज्ञ जॅक लस्कर यांनी सौर यंत्रणेतील गोंधळ (solar system chao) यांसारखे अनेक समान अभ्यास प्रकाशित केले होते. पण, विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अभ्यासात चंद्राच्या दूर जाण्याचा थेट पृथ्वीवर कसा परिणाम होऊ शकतो यावर भर देण्यात आला आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील संबंध अधिक सखोलतेने समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ खूप जुन्या खडकांचा अभ्यास करण्याचा विचार करीत आहेत.

Story img Loader