सध्या प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो. आपली अनेक कामे या सोशल मीडियाच्या मदतीने होत असतात. अनेक जण You Tube वर आपले चॅनल सुरु करून त्यामध्ये कंटेट पोस्ट करत असतात. प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे युट्युबर आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्यातील आधुनिक टेक्नलॉजी, फीचर्स यामुळे आपली कामे सोपी झाली आहेत. एकमेकांशी संवाद साधणे, फोडतो, व्हिडीओज शेअर करणे हे सर्व सोशल मीडियामुळे सोपे झाले आहे. त्यात youtube वर तर आपण अनेक गाण्यांचे व्हिडीओ, बातम्या आणि अनेक गोष्टी पाहू शकतो.

सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन आणि विचित्र अशी प्रकरणे समोर येत असतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे सोशल मीडियावरून पोपट विकण्याचे प्रकरण समोर आले आहे. आसाममधील एका यूट्यूबरला त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोपट विकण्याची ऑफर दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण आसाममधील कोक्राझार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. PETA अंतर्गत यूट्यूबर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे

यूट्यूबर पेटा अंतर्गत गुन्हा दाखल

कचुगाव विभागीय वन अधिकारी (डीएफओ) भानू सिन्हा यांनी PTI शी बोलताना सांगितले की, जाहिदुल इस्लाम नावाच्या युट्यूबरला त्याच्या यूट्यूब चॅनेलवर पोपट विकण्याची ऑफर दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला गोसाईगाव पोलिसांनी पकडून नंतर वनविभागाच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले. भानू सिन्हा म्हणाले की आरोपीला पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) च्या तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. तक्रार मिळाल्यानंतर आमच्या विभागाने स्थानिक पोलिसांसह त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि पोलिसांनी त्याला शुक्रवारी गोसाईगाव येथून अटक करून दुसऱ्या दिवशी आमच्या ताब्यात दिले. असे भानू सिन्हा यांनी सांगितले.

हेही वाचा : Tech Layoff: आर्थिक मंदीचा मोठा फटका! ‘या’ दिग्गज टेक कंपनीमध्ये पुन्हा एकदा ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची होणार कपात

युट्युबरच्या ‘जाहिद लाइफस्टाइल’ या यूट्यूब चॅनलविरोधात प्राणी हक्क संघटनेने तक्रार दाखल केली होती. खरे तर यूट्यूब चॅनेलवर तो आपल्या साथीदारांसह जंगलात प्रवेश करत असताना , पोपटांच्या घरट्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना पकडण्यासाठी झाडांवर चढत असल्याचे व्हिडिओ आहेत. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत पोपट पकडणे आणि विकणे बेकायदेशीर आहे.

जाहिदुल इस्लामवर पेटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. PETA ला दिलेल्या जबाबामध्ये जाहिदुल इस्लामचा आरोप केला आहे की, YouTuber हे पोपटांचे पालन आणि त्यांना कसे खायला घालायचे याबद्दल “शैक्षणिक” कंटेंट तयार करण्याच्या बहाण्याने पोपटाच्या पिल्लांना पाण्यात मिसळलेली साखरेची बिस्किटे खायला देताना दिसतात जो त्यांच्या नैसर्गिक आहार नाही आहे. हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

PETA India Cruelty Response Coordinator सलोनी साकारिया यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुन्हेगाराला अटक केल्याबद्दल आणि पोपटाची सुटका केल्याबद्दल पेटा इंडिया कचुगाव वनविभागाचे कौतुक करते. पुढे त्या म्हणाल्या की पोपटांना पकडणे आणि खरेदी करणे, त्यांची विक्री करणे , पिंजऱ्यात ठेवणे या कृती बेकायदेशीर आहेत. यामध्ये गुन्हेगारांना तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५,००० रुपयांचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

हेही वाचा : ट्विटरसारखं अ‍ॅप तयार करणाऱ्या झुकरबर्ग यांची एलॉन मस्कनी दोन शब्दांत उडवली खिल्ली; म्हणाले…

जाहिदुल इस्लामच्या युट्युब चॅनेलच्या होम पेजवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्याने हा चॅनेल १२ जून २०२० रोजी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरु लॉन्च केला. त्याने आजवर त्याच्या चॅनेलवर ३२६ व्हिडीओ अपलोड केले आहे आणि त्याचे ७.६४ हजार इतके स्बस्क्रायबर्स आहेत.