scorecardresearch

‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक!

फेसबुक वापरतांना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दुर्लक्ष केल्यास तुमचे फेसबुक अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकते.

‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक!
( संग्रहित छायचित्र )

सोशल मीडिया, आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यातील फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात होत चालला आहे. पण फेसबुक वापरतांना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दुर्लक्ष केल्यास तुमचे फेसबुक अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे तुमचे फेसबुक अकाउंट ब्लॉक होऊ शकते.

ही आहेत कारणे

  • फेसबुकवर खाते ब्लॉक करण्यामागचे एक कारण म्हणजे बनावट खाते असणे. फेसबुक यावर सतत नजर ठेवते आणि जर तुम्ही फेक अकाऊंट चालवले, तर तुमचे अकाउंट ब्लॉकही होऊ शकते.
  • जर तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटवरून अशा गोष्टी शेअर करत असाल, ज्यामुळे एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात आणि त्यामुळे दंगल भडकते. त्यामुळे अशा स्थितीत, एकतर तुमच्या खात्याबाबत तक्रार आल्यावर किंवा अनेक प्रकरणांमध्ये, फेसबुक स्वतःच असे खाते ब्लॉक करते.

आणखी वाचा : गुगल करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा बंद ; जाणून घ्या कारण…

  • तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त फोटो, व्हिडीओ किंवा इतर कोणत्याही ग्रुपवर पेजची लिंक शेअर केल्यास. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचे फेसबुक अकाउंट बंद होऊ शकते. त्याची मर्यादा लक्षात ठेवावी लागेल.
  • अनेक वेळा असे देखील घडते की आपण आपल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड विसरतो आणि नंतर अनेक वेळा चुकीचा पासवर्ड टाकतो. या प्रकरणात तुमचे खाते ब्लॉक केले जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा चुकीचा पासवर्ड टाकण्याऐवजी पासवर्ड लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा.
  • जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून अशा कोणत्याही दहशतवादी संघटनेत सामील झालात किंवा कोणत्याही दहशतवादी कारवाईंमध्ये सामील असल्याचे आढळल्यास, तुमच्यावर कारवाई करून तुमचे खाते ब्लॉक केले जाऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या