Mistakes While Buying New Smartphone : मनोरंजनाचे जबरदस्त साधन असल्याने स्मार्टफोन लोकांचे आवडते उपकरण झाले आहे. त्या शिवाय करमत नाही अशी काहींची अवस्था आहे. मेसेज, इंटरनेट, व्हिडिओ, गाणी इत्यादी गोष्टींचा आनंद घेता येत असल्याने अनेकांना स्मार्टफोन हवा असतो. स्मार्टफोन विकत घेताना किंमत आणि फीचर्सना प्राधान्य दिले जाते. मात्र, किंमत आणि फीचर्सच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत ज्या स्मार्टफोन खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजे, अन्यथा पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊया.

१) डिस्काउंटच्या आधारावर स्मार्टफोन निवडू नका

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

सध्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. ई कॉमर्स वेबसाईटवर भरपूर सवलती आणि ऑफर्स मिळतात. बचत होईल या आशेने लोक फीचर्स न पाहता स्मार्टफोन खरेदी करतात आणि नंतर महत्वाचे फीचर न मिळाल्याने निराशा होते. म्हणून फोन खरेदी करताना आवश्यकतेनुसार फीचर्स आणि इतर गोष्ठी तपासून फोन खरेदी करा. केवळ डिस्काउंट पाहून फोन खरेदी करू नका.

(२०० एमपी कॅमेरासह लाँच झाला Infinix Zero Ultra 5G; १२ मिनिटांत होतो फूल चार्ज, जाणून घ्या किंमत)

२) ४ जी फोन टाळा

भारतात ५ जी सेवा सुरू होऊन २ महिने उलटले आहेत. देशातील ५० शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू झाली आहे. पुढील वर्षापर्यंत ही सेवा संपूर्ण भारतात सुरू होऊ शकते. त्यामुळे आता जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ४ जी फोन घ्यायचे टाळा आणि ५ जी फोन घ्या. ४ जी फोनमध्ये ५ जी सेवा चालत नाही. म्हणून फोन खरेदी करताना ५ जी फोन खरेदी करा.

३) फोनचे वजन, आकार तपासा

फोन घेताना तो हलका आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा आहे की नाही हे तपासा. कारण फोन हा नेहमी सोबत असतो. म्हणून त्याला सोबत ठेवताना आकारामुळे किंवा वजनामुळे समस्या होऊ नये यासाठी फोन घेताना तो हलका आहे की नाही किंवा त्याचा आकार तुम्हाला पाहिजे तसा आहे की नाही, हे तपासून फोन खरेदी करा.

(सिंगल चार्जवर १० दिवस चालते ‘ही’ Smartwatch, खास तरुणी आणि महिलांसाठी, किंमत केवळ..)

४) सॉफ्टवेअर अपडेट

सध्या अँड्रॉइड १३ हा गुगलचा नवीन ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड फोन्ससाठी उपलब्ध आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टीम नवीन फिचर्ससह येतो. याने मोबाईल वापरण्याचा अनुभव आणखी चांगला होतो. मार्केटमध्ये जुने ओएस असलेले फोन्स देखील उपलब्ध आहेत. नंतर ते एकदाच अपडेट होऊ शकतात. मग ते लेटेस्ट अपडेट घेत नाही. त्यामुळे, फोन खरेदी करतान लेटेस्ट अँड्रॉइड अपडेटसह फोन घ्या. फोनला किती अँड्रॉइड्स अपडेट आणि सुरक्षा अपडेट्स मिळतील हे देखील माहिती करा.