scorecardresearch

केंद्र सरकारच्या Chiniese Apps वरील बंदीचा देशी अ‍ॅप्सवरही परिणाम, जाणून घ्या

सुमारे २३२ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश मोदी सरकारने दिला होता.

lazypay and kissht loan app stop working
loan Apps – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

भारत सध्या टेक्नॉलॉजी, संरक्षण , अर्थ, आयात नियत सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. यामुळे शेजारील राष्ट्र चीन भारताला कमकुवत करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. चीनने भारतात बेकायदेशीरपणे लोन अ‍ॅप्स आणि त्यावरून जुगाराचे धंदे चालवत होता. आता त्यावर भारत सरकारने डिजिटल स्ट्राईक केली आहे. म्हणजेच सुमारे २३२ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश मोदी सरकारने दिला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर केवळ चीनच नाही तर अनेक देशांतर्गत अ‍ॅप्सवरही परिणाम झाला आहे.

केंद्र सरकारने बंदी घालत्यावर देशातील अ‍ॅप्सनी त्यांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. यामध्ये LazyPay अ‍ॅप देखील आहे ज्याला ब्लॉक करण्यात आले आहे. याच्या वेबसाईटने आणि अ‍ॅपने काम करणे थांबवले असल्याची माहिती PayU द्वारे समर्थित LazyPay ने दिली आहे.

हेही वाचा : Chinese Apps Ban: मोदी सरकारचा चीनला दणका; २३२ अ‍ॅप्सवर घालणार बंदी, जाणून घ्या कारण

LazyPay अ‍ॅप कसे काम करते ?

Lazypay अ‍ॅप ग्राहकांना वैयक्तिक कर्ज , आता खरेदी करा नंतर पैसे भरा , नो कोस्ट ईएमआय आणि स्कॅन करा आणि नंतर पैसे द्या यासारख्या ऑनलाईन सुविधा पुरवते. तसेच फ्लिपकार्ट पे लेटर यासारख्या पे लेटर सुविधेचा लाभ देखील ग्राहक घेऊ शकतात. एक अहवालानुसार Kissht अ‍ॅप या बंदीमुळे पप्रभावित झाले आहे. मात्र या अ‍ॅपने काम थांबवण्याचे कारण हे सरकारने चिनी अ‍ॅपवर कारवाई हे आहे की नाही ते कळू शकलेले नाही.

kissht App कसे काम करते ?

Kishsht अ‍ॅप हे भारताततील ऑनलाइन कर्ज देणारे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर ईएमआयद्वारे फ्रिज, टीव्ही ,मोबाईल , लॅपटॉप यासारख्या वस्तू ग्राहकांना सहज खरेदी करता येतात. केंद्र सरकारने चीनी अ‍ॅप घातलेल्या बंदीची अंमलबजावणी आजवर एकसारखी झालेली नाही. दूरसंचार सेवा कंपन्यांनी Lazypay आणि Kisht च्या वेबसाइट्स ब्लॉक करून सरकारच्या आदेशाचे पालन केल्याचे दिसत आहे. मात्र तरीदेखील ते अ‍ॅप्स Apple आणि Google च्या अ‍ॅप स्टोअरवर दिसत होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 11:06 IST