मोबाईल रिचार्ज हे इतर वस्तूंप्रमाणे महाग झाले आहेत. प्रत्येक कंपनीने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. अशात कमी किंमतीचा आणि बेस्ट ऑफर देणारा रिचार्ज प्लॅन कोणता आहे, याच्या शोधात आपण असतो. जर तुम्ही जिओचे सिमकार्ड वापरत असाल, तर जिओकडून ५०० रुपयांच्या किंमतीमधील काही प्लॅन्स बेस्ट ऑफरसह उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध असतो. तसेच ओटीटी सब्सक्रीपशन, अनलिमिटेड कॉलिंग अशा वेगवेगळ्या ऑफर या प्लॅन्समध्ये देण्यात आल्या आहेत. कोणते आहेत जिओचे बेस्ट ऑफर जाणून घेऊया.
आणखी वाचा : ‘ऑर्डर करू ना’ म्हणत किती पैसे उधळलेत? Swiggy ठेवतंय खर्चाचा रेकॉर्ड, ‘असा’ तपासून पाहा
जिओचा २४९ रुपयांचा प्लॅन
- या प्लॅनमध्ये एकुण ४६ जीबी डेटा उपलब्ध असतो. यापैकी दररोज २ जीबी डेटा वापरता येतो.
- यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रत्येक दिवशी १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध असते.
- या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सीक्युरिटी अशा जिओ ॲप्सचे फ्री सबस्क्रीप्शन दिले जाते.
- हा प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध असतो.
जिओचा २९९ रुपयांचा प्लॅन
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- २९९ रुपयांचा हा प्लॅन ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील बेस्ट प्लॅन आहे.
- या प्लॅनमध्ये एकुण ५६ जीबी डेटा उपलब्ध असतो. त्यापैकी दररोज २ जीबी डेटा वापरता येतो.
- यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रत्येक दिवशी १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध असते.
- या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सीक्युरिटी अशा जिओ ॲप्सचे फ्री सबस्क्रीप्शन दिले जाते.
- हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध असतो.
जिओचा ५३३ रुपयांचा प्लॅन
- ५३३ रुपयांच्या या प्लॅनमध्ये एकुण ११२ जीबी डेटा उपलब्ध होतो. त्यापैकी दररोज २ जीबी डेटा वापरता येतो
- यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रत्येक दिवशी १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध असते.
- या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सीक्युरिटी अशा जिओ ॲप्सचे फ्री सबस्क्रीप्शन दिले जाते.
- हा प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध आहे.