तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर आजच खरेदी करा 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमीने स्टायलिश कॅमेरे असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आले आहेत. (photo credit: mi.com)

स्मार्टफोन म्हणजे फोटोग्राफी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग. स्मार्टफोनने लोकांना फोटोग्राफर बनवले आहे. कोणत्याही पर्यटन स्थळी जा, लोकं त्यांच्या स्मार्टफोनमध्ये निसर्गाचे सुंदर दृश्य टिपताना दिसतात. आज बाजारात हाय रिझोल्युशन कॅमेरे असलेले स्मार्टफोन आहेत. आता फोनमध्ये १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेले बरेच स्मार्टफोन आहेत.

अलीकडेच १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आले आहेत. तुम्हालाही फोटोग्राफीची आवड असेल आणि आयुष्यातील अविस्मरणीय क्षण सुंदर चित्रांमध्ये टिपायचे असतील, तर येथे अशा अनेक स्मार्टफोन्सची चर्चा करत आहोत जे फोटोग्राफीचा उत्तम अनुभव तर देतातच पण ते पॉकेट फ्रेंडली देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात

रेडमी नोट १० प्रो मॅक्स

स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमीने स्टायलिश कॅमेरे असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यापैकी एक फोन रेडमी नोट १० प्रो मॅक्स आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत.

रेडमी नोट १० प्रो मॅक्स स्मार्टफोनमध्ये ८ MP अल्ट्रा-वाइड, २ MP पोर्ट्रेट आणि ५ MP मॅक्रो मोड कॅमेरासह १०८-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, तुमच्याकडे फोनच्या पुढील बाजूस १६-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये ६.६७-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि ५०२०mAh बॅटरी आहे. रेडमी नोट १० प्रो मॅक्सची किंमत १९,९९९ रुपये आहे.

रियलमी ८ प्रो

रियलमी ८ प्रो चे १२८ जिबी व ८जिबी रॅम असलेला हा चांगला फोन आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. ८ जिबी रॅम आणि १२८ जिबी इंटरनल स्टोरेज क्षमता असलेल्या या फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. रीयलमी ८ प्रो स्मार्टफोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

रियलमी ८ प्रो मध्ये १०८-मेगापिक्सेलच्या प्राथमिक सेन्सरसह एक ८-मेगापिक्सेल आणि दोन २ मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. समोर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन ६.४-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि ४५००mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

मोटोरोला मोटो G६०

मोटोरोलाच्या मोटो G६० फोनची किंमत १७,९९९ रुपये आहे.६ जिबी रॅम आणि १२८जिबी अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे.

मोटोरोला मोटो G६० फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल आणि २-मेगापिक्सल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी समोर ३२-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. मोटोG60 स्मार्टफोनचा डिस्प्ले १२०Hz च्या रीफ्रेशसह येतो आणि त्याचा आकार ६.७८इंच आहे. या फोनमध्ये ६०००mAh बॅटरी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best smartphone for photography motorola moto g60 redmi note 10 pro max and realme 8 pro mobile phone scsm

Next Story
Facebook आणि Instagram वर येणार नवीन फिचर; खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होणार आकर्षक पर्याय
फोटो गॅलरी