हल्ली प्रत्येकाकडेच स्मार्टफोन असतो. प्रत्येकजण आपल्याला कसल्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार प्रत्येकजण स्मार्टफोनची खरेदी करतो. म्हणजे कॅमेरा, स्टोरेज, डिस्प्ले बघून आपण याची खरेदी करतो. सध्या अनेक मोबाइल उत्पादक कंपन्या नवनवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॅान्च करत असतात. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण जून महिन्यात बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त २५,००० रुपयांच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

Redmi K50i 5G

Redmi K50i 5G हा स्मार्टफोन २५ हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये असणारा एक स्मार्टफोन आहे. चांगला परफॉर्मन्स असणारा फोन ग्राहक शोधात असल्यास हा एक एक चांगला स्मार्टफोन आहे. हा फोन सध्या २०,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास हूड अंतर्गत डायमेनसिटी 8100 SoC आणि ८ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी UFS 3.1 स्टोरेज तसेच १४४ Hz एलसीडी डिस्प्ले मिळतो. यामध्ये ५०८० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ६७W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

हेही वाचा : SmartPhones Under 25000: Realme पासून Lava पर्यंत ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन; १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…, जाणून घ्या फीचर्स

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite या फोनमध्ये वापरकर्त्यांना यामध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतका असणार आहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आहे. वापरकर्त्यांना यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आले आहे. या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके आहे. नेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर आहेत.

OnePlus Nord CE 3 Lite 5G या फोनमधील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंस्ट्रल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही Chromatic Gray आणि Pastel Lime या रंगांमध्ये खरेदी करू शकता. 

Realme 10 Pro+ 5G

२५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील स्मार्टफोनमध्ये पुढील स्मार्टफोन आहे Realme 10 Pro+ 5G . या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा मिळतो. Realme 10 Pro+ 5G या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. हा फोन एक व्हिज्युअल ट्रीट आहे. यामध्ये डायमेन्सिटी 1080 SoC प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. रिअलमीच्या या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि ६७ W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड १३ या सॉफ्टवेअरवर चालतो.

हेही वाचा : अतिरिक्त डेटा वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भारती Airtel ने आणला ‘इतक्या’ रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन, जाणून घ्या

Poco X5 Pro 5G

Poco X5 Pro ला Redmi Note 12 Pro+ प्रमाणेच फीचर्स देण्यात आली आहे. तसेच यामध्ये ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा , १०८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर दिला आहे. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज कंपनीकडून वापरकर्त्यांना देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी वाव ६७ वॅटचे चार्जिंग सपोर्ट मिळतो.