Battlegrounds Mobile India (BGMI) या ऑनलाइन गेमवर गेल्या वर्षी भारत सरकारने बंदी घातली होती. परंतु काही दिवसांनी शासनाद्वारे ही बंदी उठवण्यात आळी. तब्बल १० महिन्यांनंतर BGMI गेम खेळता येणार असल्याने गेमर्स खुश आहेत. पण सरकारच्या अटींप्रमाणे या खेळामध्ये बदल केले असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अटींचे पालन न केल्यास BGMI वर पुन्हा निर्बंध लादण्यात येतील. २९ मे रोजी या गेमचे सर्व्हर लाइव्ह होणार असल्याची माहिती मागच्या आठवड्यात समोर आली होती. BGMI हे Google Play Store परत आले आहे. 2.5 Update असलेला हा लोकप्रिय गेम भारतातील डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २९ मे रोजी BGMI गेम भारतामध्ये नव्या अपडेट्ससह लॉन्च होणार आहे. यानंतर पुढील ३ महिन्यांसाठी या ऑनलाइन खेळावर सरकारी अधिकाऱ्यांचे लक्ष असेल. निरीक्षणादरम्यान गेममध्ये गडबड आढळल्यास शासनाद्वारे पुन्हा एकदा कठोर कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वी BGMI गेम २७ मे पासून डाऊनलोडसाठी उपलब्ध होईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार गेमर्स बा गेम प्रीलोड करु शकणार होते. पण दोन दिवसांनी म्हणजेच २९ मे रोजी गेमिंग सर्व्हर लाइव्ह होणार आहे, असे म्हटले जात होते. याबाबत BGMI गेमिंग कंपनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ‘जर तुम्ही Android यूजर आहात, तर तुम्ही आज (27 May) प्रीलोड करु शकता आणि २९ मेपासून खेळू शकता. iOS यूजर्सदेखील २९ मेपासून खेळाचा आनंद घेऊ शकणार आहेत’ असे म्हटले होते.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

BGMI update

BGMI च्या 2.5 update मधील गेमप्लेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय त्यात नव्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. Nusa या नव्या उष्णकटिबंधीय नकाशाच्या रुपाचत मोठा बदल खेळाडूंना जाणवेल. या बदलामुळे त्यांना गेममध्ये नवे डावपेच वापरण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांच्या निर्णयक्षमतेचा कस लागणार आहे. दोन नवीन शस्त्रे, टॅक्टिकल क्रॉसबो आणि NS2000 शॉटगन यांसारख्या नव्या गोष्टी अपडेटेड BGMI गेममध्ये पाहायला मिळतील. गेमर्सना Quad २-सीटर चारचाकी वाहन आणि नवीन Stygian Liege X-Suit यांचा Access मिळणार आहे.

आणखी वाचा – मायक्रोसॉफ्टने भारतात लॉन्च केला ‘जुगलबंदी’ चॅटबॉट; ChatGpt ला देणार टक्कर, ग्रामीण भागांमधील लोकांपर्यंत….

टिममधून नुकतंच Eliminate झालेल्या खेळाडूसाठी Super Recall feature ची सोय करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंना त्यांच्या रणनीतींमध्ये बदल करता यावा यासाठी गेममध्ये Zip lines समाविष्ट करण्यात आले आहेत. रिलॉन्च आणि अपडेट सेलिब्रेट करण्यासाठी BGMI गेम खेळणाऱ्यांना कंपनीने ४ नवे सूट मोफत उपलब्ध करुन दिले आहेत.