Battlegrounds Mobile India (BGMI) या गेमवर भारत सरकारने बंदी घातली होती. पुढे ऑनलाइन खेळावरील निर्बंध काढण्यात आले. हा गेम तब्बल १० महिन्यांनी भारतात कमबॅक करणार आहे. शासनाच्या अटीप्रमाणे त्यामध्ये बदल देखील करण्यात आले आहेत. आज २९ मे पासून BGMI गेमचे सर्व्हर लाइव्ह झाले आहे. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध झाला असून असंख्य गेमर्स हा गेम डाऊनलोड करत आहेत. पण काही यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये गेम इन्स्टॉल केल्यानंतर सुरु होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BGMI गेम ओपन केल्यावर स्मार्टफोनवर हा ऑनलाइन खेळ टप्प्यांमध्ये रिलीझ होणार आहे. स्मार्टफोनपर्यंत गेमचा नवीन अपडेट पोहचेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल असे सांगितले जात आहे. मागील १० महिन्यांपासून हा गेम कधी परत लॉन्च होईल याकडे गेमर्स लक्ष ठेवून आहेत. BGMI च्या अपडेटबाबतच्या नोटीसमुळे अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. पण एक सोपी ट्रिक वापरुन कोणीही Battlegrounds Mobile India गेम खेळू शकणार आहे.

आणखी वाचा – BGMI 2.5 Update: १० महिन्यांच्या बंदीनंतर आज Battlegrounds Mobile India होणार लाइव्ह; ‘इथून’ करता येणार डाऊनलोड

India Today ने दिलेल्या माहितीनुसार, Krafton कंपनीने या नव्या अपडेटमध्ये एक प्रमुख नियम बदलला आहे. यात वेळेची बंधन (Time Limit) आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजर्ससाठी हा गेम खेळायचा कालावधी ३ तासांचा असणार आहे. तर १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती सहा तास BGMI गेम खेळू शकते. त्याशिवाय Parental verification चाही गेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा – Airtel चे २०० रुपयांच्या आतमधले ‘हे’ प्रीपेड प्लॅन पाहिलेत का? अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…

यूजर्संनी त्यांच्या स्मार्टफोनमधील BGMI अ‍ॅप हे प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरुन अपडेट करावे. BGMI 2.5 Update व्हर्जन डाऊनलोड करुन घ्यावे. जर अ‍ॅप सुरु केल्यावर BGMI गेम टप्प्यांमध्ये रिलीझ होणार आहे किंवा गेमचा सर्व्हर लाइव्ह नसल्याची नोटीस दिसल्यास पुढील BGMI गेम सुरु व्हावा यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.

Step 1: मोबाइलमधील इंटरनेट बंद ठेवा. (मल्टी टास्किंगमधून काढून BGMI गेम बंद करा.)

Step 2: आता BGMI गेम अ‍ॅप सुरु करा.

Step 3: गेम खेळण्यासाठी इंटरनेटची सेवा सुरु असणे आवश्यक असल्याची नोटीस येईल.

Step 4: ही नोटीस आल्यावर इंटरनेट सुरु करा.

Step 5: कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्म किंवा प्ले गेम्सद्वारे लॉग इन करा. आता तुम्ही BGMI गेम खेळू शकता.

(टीप: ही करुन सुद्धा जर गेम सुरु होत नसेल, तर तुम्हाला दोन दिवस वाट पाहावी लागेल. Krafton कंपनीने BGMI 2.5 Update सर्व यूजर्सपर्यंत पोहचण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागू शकतो असे म्हटले आहे.)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bgmi 2 5 update having trouble playing the game follow these easy steps to play battlegrounds mobile india on smartphone yps
First published on: 29-05-2023 at 18:45 IST