Bharati Airtel ने देशामध्ये मागच्या वर्षी ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. ४ जी नेटवर्कपेक्षा ५ जी नेटवर्कमध्ये लोकांना चांगला इंटरनेटचा स्पीड आणि चांगला कॉलिंग अनुभव मिळतो. या वर्षीच्या अखेरपर्यंत भारती एअरटेलचे उद्दिष्टे हे देशातील प्रत्येक ठिकाणी आपले ५ जी नेटवर्कची सेवा देणे हे आहे.

नुकतेच कंपनीने आपले प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांना अनलिमिटेड ५ जी नेटवर्क डेटा Acess करण्याचा लाभ दिला आहे. जर का तुम्ही एअरटेलचे सिमकार्ड वापरत असाल आणि आपल्यासाठी असे काही प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह ott पळतफरोमचे देखील फायदे मिळतील. आज आपण असे काही रीचार्ज प्लॅन्स जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये हे सर्व फायदे तुम्हाला मिळू शकतील.

हेही वाचा : Meta Layoffs: पहाटे ४ वाजता नोकरी गेल्याचा ईमेल मिळताच महिला कर्मचाऱ्याने लिंकडेनवर मांडली व्यथा; म्हणाल्या, “२ वर्षानंतर अचानक…”

एअरटेलचा ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये आपल्याला २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड ५ जी डेटा, १०० एसएमएस आणि कॉलिंगशिवाय ३ महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टारचे मोबाईल व्हर्जन, Xtream App, wink म्युझिक आणि दुसऱ्या Apps चे फायदे मिळतात. जर का तुमच्या एरियामध्ये ५ जी नेटवर्क नसेल तर तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे.

एअरटेलचा ८३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या ८३९ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये आपल्याला ८४ दिवसांची वैधता मिळते. त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड ५ जी डेटा, १०० एसएमएस , कॉलिंगशिवाय ३ महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टारचे मोबाईल व्हर्जन rewards मिनी App चे सब्स्क्रिप्शन, Xtream App, wink म्युझिक आणि दुसऱ्या Apps चे फायदे मिळतात. जर का तुमच्या एरियामध्ये ५ जी नेटवर्क नसेल तर तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे.

हेही वाचा : तुम्हाला तुमच्या फोनवरून Amazon Pay मध्ये पैसे अ‍ॅड करायचे आहेत? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअरटेलच्या ३,३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला वरील प्लॅनमध्ये असलेल्या सर्व सुविधा पूर्ण १ वर्षापर्यंत मिळते. जर का तुमच्या एरियामध्ये ५ जी नेटवर्क नसेल तर तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच एअरटेलच्या ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता आणि ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी वापरकर्त्यांना डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि Amazon प्राइमचे मोबाइल व्हर्जनचे सब्स्क्रिप्शन मिळते.