भारती एअरटेल ही देशातील दुसरे सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर आहे. रिलायन्स जिओ नंतर एअरटेलने आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. एअरटेलचे ५ जी नेटवर्क हे देशातील ३ हजार शहरांपेक्षा जास्त शहरांमध्ये पोचले आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रीचार्ज प्लॅन्स लॅान्च करत असते. अलीकडेच कंपनीने आपल्या मिनिमम रीचार्ज प्लॅन्सच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीमध्ये एअरटेलच्या मिनिमम रीचार्ज प्लॅनची किंमत वाढली आहे. आज आपण या रीचार्ज प्लॅन बद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेल मिनिमम रिचार्ज प्लॅन २०२३

भारती एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपल्या रिचार्ज प्लॅनमधून ९९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला. ज्यांना आपले सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर वापरकर्ते ९९ रुपयांचा प्लॅनचा वापर करत होते. मात्र आता तो ९९ रुपयांचा प्लॅन १५५ रुपयांचा झाला आहे. म्हणजेच सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आता वापरकर्त्यांना १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन वापरावा लागणार आहे. याबाबतचे वृत्त telecom talk ने दिले आहे.

हेही वाचा : एलॉन मस्कनं मागितली ट्विटर युजर्सची माफी; म्हणाला, “सॉरी, ट्विटर मोबाईल अ‍ॅप…”

एअरटेलने आपला मिनिमम रिचार्ज प्लॅन हा १५५ रुपये केल्यामुळे ग्राहकांना रिचार्ज करण्याचा खर्च वाढला आहे.

एअरटेलचा १५५ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएससह एकूण 1GB डेटा मिळतो. फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक फ्रीचे अतिरिक्त फायदे आहेत. या प्लॅनची वैधता फक्त २४ दिवस आहे. जर का तुम्हाला २८ दिवसांची वैधता असणारा प्लॅन हवा असेल तर तुम्ही १७९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिं, ३०० एसएमएस आणि २ जीबी डेटा मिळतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharati airtel users minimum 155rs recharge plan active sim card unlimited calling and wync music check details tmb 01
First published on: 28-05-2023 at 10:40 IST