जिओने (Jio) ने एक नवीन प्रीपेड रिचार्ज योजना सादर केली आहे, जी सर्वात स्वस्त आहे. या प्रीपेड पॅकची किंमत फक्त १ रुपये आहे आणि त्याची वैधता ३० दिवस आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये वैधतेसोबत डेटाचे फायदेही मिळतात. हा पॅक सध्या MyJio अॅपवर लाइव्ह आहे आणि Jio चे सदस्य ते रिचार्ज करू शकतात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

जिओचा १ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जीओच्या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत रु. १ आहे ज्यात वापरकर्त्यांना ३० दिवसांची वैधता मिळत आहे. यासोबतच हा पॅक ग्राहकांना 100MB डेटा देखील देत आहे. हा डेटा संपल्यानंतर यूजर्स ६४ Kbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट वापरू शकतात.

( हे ही वाचा: Aadhaar-Voter ID Linking: व्होटर कार्डला आधार कसं लिंक करायचं? जाणून घ्या स्टेप्स )

हा पॅक तुम्हाला MyJio अॅपच्या Value विभागात मिळेल. येथे तुम्हाला परवडणाऱ्या पॅकमध्ये तीन पॅक दिसतील. याच्या अगदी खाली, इतर प्लॅनमध्ये, हा १ रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे.

( हे ही वाचा: Jio-Airtel-Vi चे १०० रुपयांच्या आतील ‘हे’ आहेत रिचार्ज प्लॅन्स; जाणून घ्या संपूर्ण तपशील)

११९ रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल करण्यात आला

रिलायन्स जिओने याआधीही आपल्या ११९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले होते. कंपनी आता या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना आउटगोइंग एसएमएस सुविधा देखील देत आहे. या प्लॅनमध्ये १४ दिवसांची वैधता आणि 1.5GB दैनिक डेटा उपलब्ध आहे, ज्यामध्ये आता ३०० SMS देखील जोडले गेले आहेत.

( हे ही वाचा: १८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी )

यापूर्वी या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत ९८ रुपये होती. या प्लॅनची ​​वैधता देखील २८ दिवसांची होती आणि यामध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट डेटासह ३०० SMS ची सुविधा मिळाली. पण कंपनीने तो बंद केला होता, त्यानंतर ११९ रुपयांचा नवीन प्लान सादर केला होता. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना १४ दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती आणि आता कंपनीने या लिस्टमध्ये ३०० एसएमएस सुविधा देखील जोडली आहे.