Discount Galaxy Z Flip 3 Flipkart : बाजारात फ्लिप तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा आहे. सॅमसंगने आपल्या SAMSUNG Galaxy Z Flip3 स्मार्टफोनमध्ये हे तंत्रज्ञान दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे मोबाइल मधातून फोल्ड करता येतो. याने फोनचा आकार अर्धा होत असल्याने त्याला खिशात ठेवण्यासाठी जागा कमी लागते. या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फोन्सपेक्षा फ्लिप फोन दिसायला हटके आणि लक्षवेधी ठरतो. Galaxy Z Flip3 फोनची किंमत १ लाखांच्या जवळपास आहे. मात्र, फ्लिपकार्टने या फोनवर मोठी सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन आता कमी बजेटमध्ये खरेदी करता येऊ शकते.

किती मिळतंय सूट?

supriya sule file nomination
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Even before the arrival of Padwa festival the price of gold is over 72 thousand
पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे!
Aslam shah
उमेदवारी अर्जासाठी १० हजारांची चिल्लर; नाणी मोजताना अधिकाऱ्यांना एसीतही फुटला घाम, मोजणी संपल्यानंतर…

फ्लिपकार्टवर Galaxy Z Flip3 स्मार्टफोनची लिस्टेड किंमत ९५ हजार ९९९ रुपये आहे, मात्र या फोनवर चक्क २६ हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये झाली आहे. पण, इतकेच नसून १७ हजार ५०० रुपयांची बचत होऊ शकते.

(आता ‘या’ १३ Xiaomi आणि Redmi फोन्समध्ये सुसाट चालणार Jio 5G, यादीत तुमचा फोन आहे का?)

फ्लिपकार्ट गॅलक्सी झेड फ्लिप ३ स्मार्टफोनवर १७ हजार ५०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर देत आहे. याने फोनची किंमत आणखी कमी होऊन ती ५२ हजार ५९९ रुपये होते. म्हणजेच, तुमची एकूण ४३ हजार ५०० रुपयांची बचत होऊ शकते. मात्र, एक्सचेंज ऑफर हे फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे. त्यानुसार एक्सचेंज ऑफरची रक्कम निश्चित होते.

Galaxy Z Flip3 स्मार्टफोनवर बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर २००० रुपयांपर्यंत १० टक्के सूट मिळू शकते. तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक ट्रान्झॅक्शनवर ५ टक्के कॅशबॅक मिळते.

(लाँच झाली Redmi K60 सिरीज, Wireless charging, १६ जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स, वाचा संपूर्ण माहिती)

फीचर्स

Galaxy Z Flip3 मध्ये फ्लिप तंत्रज्ञान हे या स्मार्टफोनचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा ५ जी फोन असून त्यामध्ये ८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज, ६.७ इंच फूल एचडी डिस्प्ले, १२ मेगापिक्सेलचे दोन बॅक कॅमेरे आणि १० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ३३०० एमएएच लिथियम आयन बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ ऑक्टो कोअर प्रोसेसर मिळतो.