टेक कंपनी Google दरवर्षी आपली पिक्सेल सीरीज वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत बाजारामध्ये आणते. गुगलच्या पिक्सेल स्मार्टफोन्सनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे, पण भारतात आयफोन आणि सॅमसंगच्या फ्लॅगशिप्सने जो दर्जा मिळवला आहे, तो गुगलच्या पिक्सेल स्मार्टफोन्सना मिळवता आलेला नाही. २०१८ मध्ये आलेल्या Pixel 3 आणि Pixel 3 XL स्मार्टफोन्सना खूप पसंती मिळाली, पण विक्रीच्या बाबतीत ते विक्रम बनवू शकले नाहीत. या वर्षी गुगलने रणनीती बदलली आहे. काही महिन्यांपूर्वी, त्याने पिक्सेल 6a स्मार्टफोन मिड-रेंजमध्ये सादर केला होता, ज्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता Pixel 7 आणि Pixel 7 Pro भारतात सादर होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Google चे आगामी फोन Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro या आठवड्यात भारतात सादर होणार आहेत. भारतात Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे सादरीकरण ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे, परंतु त्यापूर्वी फोनचे डिझाइन आणि फीचर्स समोर आले आहेत. चला तर मग या फोन्समध्ये काय असेल जाणून घेऊयात.

फीचर्स

Pixel 7 Pro स्मार्टफोन भारतात तीन रंगामध्ये सादर करण्यात येईल. हे ऑब्सिडियन, स्नो आणि हेझेल रंग पर्यायांसह आणले जाईल. तथापि, आयफोन १४ च्या रंग पर्यायांशी तुलना केल्यास, ते खूपच कमी आहे. कलर वेरिएंट व्यतिरिक्त, Google च्या आगामी स्मार्टफोनचे डिझाइन देखील समोर आले आहे. प्रतिमा दर्शविते की Pixel 7 चे डिझाइन त्याच्या आधी आलेल्या मॉडेल्ससारखेच आहे.

अलीकडेच स्पेस शीटच्या लीकमध्ये हे उघड झाले आहे की नवीन फोनमध्ये फारसा बदल झालेला नाही. PIXEL 7 PRO अपग्रेड केलेल्या TENSOR G2 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो, ज्यामुळे त्याची कामगिरी आणखी चांगली होण्याची अपेक्षा आहे. हे १२ जीबी रॅमने सुसज्ज असेल, ज्यामध्ये अंतर्गत स्टोरेज म्हणून १२८ जीबी आणि २५६ जीबी पर्याय असतील. फोनला  ६.७-इंचाचा QHD + OLED डिस्प्ले मिळेल, जो १२०HZ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

आणखी वाचा : 5G स्मार्टफोन घेताय तर ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…

बॅटरी

PIXEL 7 PRO मध्ये फक्त ५०००MAH बॅटरी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. हे ३०W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा सेटअपमधील महत्त्वाचा बदल इमेज सेन्सर असू शकतो. असे म्हटले जात आहे की यावेळी GOOGLE SONY IMX582 सेन्सरऐवजी ४८MP SAMSUNG GM1 सेंसर टेलीफोटो कॅमेरासाठी वापरेल. याशिवाय, फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि १२MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. सेल्फी कॅमेरा ११MP चा असेल.

किंमत

भारतात PIXEL 7 आणि PIXEL 7 PRO ची किंमत काय असेल, हे अद्याप माहित नाही. गुगलची पूर्वीची पिक्सेल उपकरणे आयफोनशी स्पर्धा करत आहेत. अशा परिस्थितीत, नवीन PIXEL फोन सॅमसंगच्या S22 मालिकेतील नवीन IPHONES आणि प्रीमियम उपकरणांशीही स्पर्धा करू शकतात.

 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big information about googles pixel 7 and pixel 7 pro smartphones pdb
First published on: 03-10-2022 at 11:14 IST