एलॉन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर लगेचच कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आणि ट्विटरच्या साडेसात हजारांपैकी अर्ध्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. या धक्कादायक घटनेनंतर बातमी समोर आली ती, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस् अप हे तीन मोठे ब्रॅण्डस् सांभाळणाऱ्या मेटा या कंपनीने घेतलेल्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाची. पण ही तर केवळ सुरुवात होती, आता आयटीच्या क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी सुरू केलेल्या कर्मचारी महाकपातीच्या बातम्या येऊन थडकू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : काय आहे कम्युनिटी फीचर? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे करा तयार

जगभरावर आलेले मंदीचे झाकोळ, नियंत्रणाबाहेर जाणारी वाढती महागाई, वाढणारे व्याजदर याचा मोठाच फटका या बड्या कंपन्यांना बसू लागला आहे. त्यामुळे त्यांचा महसूल वेगात खाली येऊ लागला असून बाजारमूल्यही घसरले आहे. त्यातून सावरण्यासाठी म्हणून या कंपन्यांनी आता कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. ट्विटरचे मस्क यांनी केलेले अधिग्रहण हे या साऱ्यासाठी निमित्त ठरले इतकेच. मात्र त्याहीपूर्वीपासून कर्मचारी कपातीस सुरुवात झाली आहे. काहींनी कर्मचारी कपात केली आहे, तर काहींनी नव्याने कर्मचारी सेवेत घेणे थांबवले आहे.

आणखी वाचा : तुमचा स्मार्टफोन ओव्हरहीट होतोय? चुकूनही ‘या’ चूका करू नका! अन्यथा…

मेटा
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, मेटामध्ये येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जाणार असून हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांना याचा फटका बसेल. ऑक्टोबरमध्ये संपलेल्या तिमाहीतच कंपनीला लक्षात आले होते की, महसूल रोडावला असून कंपनीच्या खर्चात वाढ झाली आहे, यामुळे बाजारमूल्य ६७ दशकोटी अमेरिकन डॉलर्सने घसरले. शिवाय गेल्या वर्षभरात मेटाला ५०० दशकोटी अमेरिकन डॉलर्सचा फटका बसला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकशी करावी लागणारी स्पर्धा, अ‍ॅपलने प्रायव्हसीमध्ये केलेले बदल, एकूणच विविध सरकारांकडून वाढलेल्या नियामक प्रक्रिया या साऱ्याचा फटका मेटाला बसला आहे.

आणखी वाचा : BSNL Recharge Plan: Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan!

स्नॅप
स्नॅपचॅट विकसित करणाऱ्या स्नॅप या कंपनीने यंदाच्या ऑगस्ट महिन्यातच एकूण ६४०० कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. गेल्या वर्षी स्नॅपचा शेअर तब्बल ८० टक्क्यांनी खाली आला, त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला. स्नॅपचे सीइओ इव्हान स्पीगेल यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या इमेलमध्ये म्हटले होते की, दीर्घकालीन फायद्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असून त्याबद्दल आपण दिलगीर आहोत.

आणखी वाचा : १० दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत केवळ २९९९ रुपये, जाणून घ्या ‘या’ घडाळीचे भन्नाट फीचर्स

मायक्रोसॉफ्ट
अ‍ॅक्सिऑसने अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टने तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. हे कर्मचारी विविध स्तरांवर काम करणारे आणि विविध विभागांमधील होते. मायक्रोसॉफ्टने अ‍ॅक्सिओसला उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, इतर कंपन्यांप्रमाणेच आम्हीही व्यवसायाचा आढावा सातत्याने घेत असतो आणि परिस्थिती पाहून प्राधान्यक्रम ठरवत काही महत्त्वाचे निर्णय कंपनीच्या भल्यासाठी घेत असतो. मात्र वाढीच्या क्षेत्रांमध्ये आम्ही निश्चितरूपाने गुंतवणूक करत राहू

आणखी वाचा : मस्तच! फक्त २ हजार रुपयांत घरी आणा नवीन लॅपटॉप; ग्राहकांची खरेदीसाठी घाई, कुठं मिळतय हे अप्रतिम ऑफर्स बघा…

इंटेल
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, इंटेलनेही खर्च कमी करण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणून हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या विक्री आणि पणन व्यवस्थापनाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. कोविड काळात संगणक खरेदी काहीशी वाढली मात्र सध्या त्या खरेदीस पुन्हा फटका बसला त्याचा कंपनीच्या महसुलावर परिणाम झाला आहे.

आणखी वाचा : Whatsapp वरील व्हिडीओ, फोटो, GIF ऑफलाईन सेव्ह करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स

अ‍ॅमेझॉन
अ‍ॅमेझॉनने आतापर्यंत तरी कुणा कर्मचाऱ्याला काढलेले नसले तरी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने नवीन कर्मचारी भरतीस मात्र स्थगिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या स्टोअर्स बिझनेसमधील कर्मचारी भरती थांबविल्याचे इमेलमध्ये म्हटले आहे. स्टोअर्स बिझनेसमध्ये प्रत्यक्ष आणि ऑनलाइन दोन्ही रीटेल व्यवसायांचा समावेश होतो. कंपनीच्या जगभरातील विविध कार्यालयांमध्ये सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. तशी माहिती नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली होती, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे म्हणणे आहे.

आणखी वाचा : एटीएम कार्ड विसरले? फोनद्वारे काढता येतात पैसे, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

अ‍ॅपल
‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याचा परिणाम आयफोनच्या नव्या मॉडेल्सच्या उत्पादनावर होणार आहे. सध्या अ‍ॅपलने एकूणच परिस्थिती पाहाता कर्मचारी भरती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big it companies going for lay off microsoft apple snapchat intel amazon meta vp
First published on: 08-11-2022 at 21:03 IST