ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप (SIG) जवळजवळ दरवर्षी, ब्लूटूथच्या अपडेटची घोषणा करतो. हे वायरलेस कनेक्टिव्हिटी फीचर जे आपल्या स्मार्टफोनला विविध स्मार्ट ॲक्सेसरीज जसे की इअरबड्स, स्मार्टवॉच, स्मार्ट रिंग, फिटनेस ट्रॅकर्स आणि बऱ्याच गोष्टींमध्ये दिसून येते, तर आता एसआयजी या ग्रुपने ब्लूटूथ ६.० (Bluetooth 6.0) च्या स्पेसिफिकेशनची घोषणा केली आहे, जे Bluetooth 5.4 चे सक्सेसर आहे (successor to Bluetooth 5.4) आणि पाहिलं तर, हे एक मोठे बदल घडवून आणू शकते. कारण- ब्लूटूथच्या नवीन व्हर्जनसह SIG ने युजर्सच्या काही चिंतांचे निराकरण केले आहे आणि नवीन व्हर्जन आता सुधारित (अपडेट) फीचर प्रदान करणार आहे.
चॅनेल साउंडिंग
१. ब्लूटूथ ६.० (Bluetooth 6.0 ) मध्ये ‘चॅनेल’ साउंडिंग नावाची एक नवीन सुविधा देण्यात येणार आहे. जिथे एक कम्पॅटिबल स्मार्टफोन किंवा अॅक्सेसरी इतर डिव्हाइसेसशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट करू शकतो. त्यामुळे तुमचे डिव्हाईस वेगाने काम करील आणि कमी बॅटरी वापरेल. Bluetooth 6.0- इक्विप्ड डिव्हाईस सुरक्षिततेशी तडजोड न करता, दुसऱ्या Bluetooth 6.0- डिव्हाईसची उपस्थिती, अंतर आणि दिशा अचूकपणे सांगू शकते.
२. या नवीन शोधामुळे एअरटॅगसारख्या नवीन युगातील ट्रॅकिंग डिव्हायसेसची निर्मिती होऊ शकते आणि त्यामुळे फोन किंवा ॲक्सेसरीज युजर्सना लिंक केलेले डिव्हाईस सहजपणे ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य होईल .
३. ब्लूटूथ ६.० (Bluetooth 6.0 ) च्या मदतीने तुम्ही हरवलेल्या वस्तू सहज शोधू शकाल.
निर्णयावर आधारित फिल्टरिंग आणि मॉनिटरिंग (Decision-based advertising filtering and monitoring)
तुमच्या आवडत्या सोशल मीडिया ॲप्ससारख्या जाहिराती डिलिव्हरी करण्यासाठी ब्लूटूथ 6.0 वापरला जाणार नाही. या संदर्भात एक ब्लूटूथ डिव्हाईस इतर ब्लूटूथ डिव्हायसेसना कसे ओळखतो, त्यांच्याशी संवाद साधतो यासाठी जाहिरात केली जाते आहे. या निर्णयावर आधारित जाहिरात प्राथमिक ब्लूटूथ डिव्हाईसवर प्राप्त झालेल्या कन्टेंटवर आधारित दुसरा डिव्हाईस स्वयंचलितपणे स्कॅन करण्याचा निर्णय घेऊ शकते आणि वीज वापर कमी करू शकते. त्याचप्रमाणे ब्लूटूथ 6.0 कार्यक्षमता सुधारण्यासाठी डुप्लिकेट डेटाचे निरीक्षण आणि फिल्टरदेखील करू शकते.
ब्लूटूथ 6.0 यामध्ये नवीन कोडिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे डेटा ट्रान्स्फरचा वेग वाढतो. तुम्ही दोन डिव्हाईसदरम्यान ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर प्रकारच्या फाइल्स शेअर करू शकता. त्याला आयसोक्रोनस ॲडॉप्टेशन लेयर (ISOAL) एन्हान्समेंट म्हणून ओळखले जाते आणि ते कमी वेळ असलेल्या ऑडिओ प्रॉडक्ट्स वापरणाऱ्यांना मदत करते. त्याचबरोबर Bluetooth 6.0 मध्ये ‘Frame Space Update’ नावाची एक सुविधा आहे, जी वेगवेगळ्या उपकरणांमधील डेटा ट्रान्स्फर सुधारते. त्यामुळे एअरबड्स, फिटनेस ट्रॅकर्स आणि अशा इतर उपकरणांची फर्मवेअर अपडेट करताना उपयोग होईल, जे फक्त Bluetooth नेटवर्किंगवर काम करतात.
ब्लूटूथ 6.0 स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजमध्ये कधी येईल?
अधिकृत माहितीनुसार स्नॅपड्रॅगन 8 एलिट ही पहिल्या स्मार्टफोन चिप्सपैकी एक आहे, जी ब्लूटूथ 6.0 ला सपोर्ट करते. तसेच वन प्लस १३ (OnePlus 13) आणि आयक्यूओओ १३ (iQOO 13)सारखे काही फोन अद्याप तरी ब्लूटूथ 5.4 पर्यंत मर्यादित आहेत. पण, काही आगामी फोन ब्लूटूथ 6.0 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतील. त्याचप्रमाणे आयफोन 16 सीरिज सध्या ब्लूटूथ 5.3 पर्यंत मर्यादित आहे आणि आगामी आयफोन 17 सीरिजसह Apple थेट ब्लूटूथ 6.0 वर जाण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये इअरबड्स, फिटनेस ट्रॅकर्स व ट्रॅकिंग डिव्हायसेसवर ब्लूटूथ 6.0 येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.