बोटने लॉन्च केला ६० तास बॅटरीवर चालणार हेडफोन; किंमतही आहे आवाक्यात

बोटने Boat Rockerz 660 नावाच्या नवीन हेडफोन्सची घोषणा केली आहे.

Boat_headphone
बोटने लॉन्च केला ६० तास बॅटरीवर चालणार हेडफोन; किंमतही आहे आवाक्यात (Photo- प्रातिनिधीक/ Financial Express)

स्मार्टफोन म्हटलं की प्रत्येकाला हेडफोनची आवश्यकता असतेच. अशात क्वालिटी हेडफोनसोबत जास्त काळ बॅटरी राहिल अशा हेडफोनच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यात करोनामुळे अनेक जण घरून काम करत आहेत. तसेच मुलांचे ऑनलाइन शाळा सुरू आहेत. त्यामुळे हेडफोनची सर्वाधिक आवश्यकता आहे. बोटने Boat Rockerz 660 नावाच्या नवीन हेडफोन्सची घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, बोटने Immortal 1300 आणि Immortal 1000D गेमिंग हेडफोन्स लाँच केले आहेत. नवीन Boat Rockerz 660 हेडफोन्स Rockerz मालिकेतील एक नवीन हेडफोन आहे. तु Boat Rockerz 660 हेडफोन ६० तासांपर्यंत बॅटरी लाइफसह येतो. याचाच अर्थ वारंवार चार्जिंग करावा लागणार नाही. याशिवाय, हेडफोन ४० एमएम ड्रायव्हर सेटअप, जलद चार्जिंग आणि ब्लूटूथ ५.० कनेक्टिव्हिटीसह येतो.

Boat Rockerz 660 हेडफोन उत्कृष्ट कानाच्या कुशनसह अर्गोनॉमिक डिझाइनसह आहे. कानाला आराम वाटेल अशी त्याची रचना आहे. हेडफोन ब्लूटूथ ५.० आणि AUX – ड्युअल कनेक्टिव्हिटी पर्यायासह येतो. या हेडफोनची खासियत म्हणजे हेडफोन घातल्याबरोबर ऑडिओ प्ले होऊ शकतो आणि तुम्ही ते काढून टाकताच ऑडिओ थांबतो. हेडफोन्समध्ये ४० एमएण ड्रायव्हर सेटअप आहे जो ड्युअल EQ मोड ऑफर करतो. त्यामुळे बास आणि बॅलन्स व्यवस्थित राहतो. यात 1,000 mAh बॅटरी असल्याने एका चार्जवर ६० तास टिकते, असा कंपनीने दावा केला आहे. तर १० मिनिटे क्विक चार्ज केल्याने ८ तासांची बॅटरी लाइफ मिळते. हेडफोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त एक तास लागतो. चार्जिंगसाठी यात टाइप-सी पोर्ट आहेत.

Tips: आयफोन १३ किंवा आयफोन १३ प्रो खरेदी केल्यानंतर प्रथम ‘या’ गोष्टी करा

हेडफोन ट्रॅक बदलण्यासाठी, संगीत थांबवण्यासाठी, आवाज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण देखील प्रदान करतात. इतर वैशिष्ट्यांमध्ये मायक्रोफोन, Google सहाय्यक आणि Siri व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, 102db + 3db संवेदनशीलता आणि ड्युअल पेअरिंग यांचा समावेश आहे. Boat Rockerz 660 बंबलबी ब्लू, फेयरी मरून आणि अ‍ॅक्टिव्ह ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हेडफोन आता फ्लिपकार्टवर २४९९ रुपयांना उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Boat launches headphones with up to 60 hours of battery life rmt

Next Story
Redmi Smart Brand Pro लवकरच भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या ‘खासियत’Redmi-Smart-Band-main
ताज्या बातम्या