भारतात सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल , वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल अशा चार प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. बीएसएनएल ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी बीएसएनएल अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. लॉन्च करत असते. बीएसएनएलचे प्रीपेड प्लॅन्स हे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये परवडणारे प्लॅन्स असतात. कारण बीएसएनएल कंपनीला अजून आपले ४ जी आणि ५जी नेटवर्क देशभरात सुरु करता आलेले नाही आहे. बीएसएनएल कंपनी भारतात ४जी लॉन्च करण्यासाठी देशांतर्गत टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. आज आपण बीएसएनएलच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती जाणून घेऊयात. रिलायन्स जिओ , एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपन्यांच्या २९९ रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लॅन सर्वात चांगला आहे. याचे कारण म्हणजे हा प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. या प्लॅनची वैधता किती असते आणि यात कोणकोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे. हेही वाचा : Best Smartphones Under 12000: १२ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट ५ जी स्मार्टफोन्स; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि… BSNL चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बीएसएनलच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या प्लॅनमधील आतापर्यंतचा हा सर्वात जास्त डेटा आहे. अन्य टेलिकॉम कंपन्या सारख्या किंमतीत २.५ जीबी ते १.५ जीबी डेटा ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३० दिवसांची वैधता मिळणार आहे. बीएसएनएल २०२५ च्या आतमध्ये देशांतर्गत टेक्नॉलॉजीचा वापर करून ४ जी नेटवर्क रोलआऊट करेल अशी अपेक्षा आहे. डेटाप्रमाणेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये अन्य कोणताही अतिरिक्त फायदा मिळत नाही. बीएसएनएल इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक डेटा ऑफर करते. मात्र तरीही ग्राहक अन्य टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन खरेदी करतात कारण ते फास्ट इंटरनेट सर्व्हिस प्रदान करतात.