scorecardresearch

Premium

ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन हवे आहे? BSNL कडे आहेत ‘हे’ भन्नाट प्लॅन्स, जाणून घ्या

भारत संचार निगम लिमिटेड ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे.

bsnl cinema plus ott plans
बीएसएनएलचा सिनेमा प्लस ओटीटी प्लॅन्स (फोटो- द इंडियन एक्सप्रेस)

भारत संचार निगम लिमिटेड ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक ओटीटी सबस्क्रिप्शन प्लॅन्स ऑफर करत आहे, जे तुम्हाला फायबर ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून अ‍ॅड-ऑन स्वरूपात खरेदी करता येऊ शकतात. बीएसएनएलने आपल्या वेबसाइटवर केलेल्या उल्लेखानुसार, ग्राहक २४९ रुपयांचा महिन्याच्या प्लॅन घेऊन आपल्या ब्रॉडबँड कनेक्शनसह अ‍ॅड-ऑन ओटीटी पॅक खरेदी करू शकतात. या सेगमेंटमध्ये असेही प्लॅन्स आहेत ज्याची किंमती यापेक्षा कमी आहे. प्लॅनची किंमत जितकी कमी असेल तितकीच त्यात मिळणारे मर्यादित स्वरूपाचे असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण अशा तीन प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.

BSNL सिनेमा प्लस ओटीटी प्लॅन्स

बीएसएनएलकडे तीन सिनेमा प्लस प्लॅन आहेत जे वापरकर्ते खरेदी करू शकतात. या प्लॅन्सची किंमत ४९ रुपये, १९९ रुपये आणि २४९ रुपये आहे. या यादीमधील सर्वात स्वस्त प्लॅन हा ४९ रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना Lionsgate, शेमारूमी, हंगामा आणि एपिकॅान या ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Job Opportunity Edsil India Limited CPSE STEM TEACHER Recruitment on contract basis
नोकरीची संधी
job opportunities
नोकरीची संधी
sensex today
सर्वोच्च मूल्यांकन असलेल्या महत्त्वाच्या ७ भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य आता ‘इतके’ कोटी
india gets first AI unicorn
देशाला मिळाला पहिला एआय युनिकॉर्न, ‘कृत्रिम’ला ५ कोटी डॉलर्सचा निधी, बाजार मूल्य एक अब्ज डॉलर्सवर पोहोचले

हेही वाचा : Reliance Jio ची ग्राहकांना दिवाळीनिमित्त मोठी भेट! ३ हजांरापेक्षाही कमी दरात सादर केला नवीन 4G फोन, किंमत फक्त…

बीएसएनएलकडे असणाऱ्या दुसऱ्या प्लॅनची किंमत १९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना झी ५, सोनी लिव्ह, YuppTV आणि डिस्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळतात. यादीतील शेवटचा प्लॅन हा प्रीमियम प्लॅन आहे.बीएसएनएलच्या २४९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना झी ५ प्रीमियम, सोनी लिव्ह, YuppTV, शेमारू, हंगामा, Lionsgate आणि डिस्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळणार आहेत.

ग्राहकांनी जर का फायबर कनेक्शन खरेदी केले असेल तरच बीएसएनएलचे सिनेमा प्लस प्लॅन फायदेशीर ठरू शकतात. वर पाहिलेले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन तुम्हाला केवळ फायबर कनेक्शनच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सक्रिय करता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsnl 49 199 and 249 rs cinema plus ott plans disney plus hotstar and many ott platforms benifits check details tmb 01

First published on: 31-10-2023 at 10:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×