BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनल (BSNL) अनेक दिवसांपासून एअरटेल, रिलायन्स जीओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांना तगडे आव्हान देत आहे. बीएसएनलकडे असे अनेक प्लॅन आहेत जे बऱ्याच बाबतीत प्रायव्हेट कंपन्यांच्या रिचार्ज पेक्षा चांगले आहेत. अशातच पुन्हा एकदा अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी बीएसएनल कंपनी सज्ज झाली आहे. जीओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनलने आपला भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे. जाणून घेऊया बीएसएनलचा नवा प्लॅन…

४९९ रुपयांचा प्लॅन

WhatsApp without internet allowed to send photos and files on Other Users Similar to apps like ShareIt
विना इंटरनेट करा फोटो,व्हिडीओ शेअर; ‘या’ ॲपमध्ये मिळणार सोय
How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
what is google wallet app
गूगलचे ‘Google wallet’ नेमके आहे तरी काय? कोणते अँड्रॉइड वापरकर्ते घेऊ शकतात याचा लाभ?
artificial intelligence tool predicts when recruiters will quit job Boss Will Know how long a new employee will stick In company
तुम्ही कधी नोकरी सोडणार हे आता बॉसला कळणार? AI करणार तुमची पोलखोल, असा होणार ‘या’ नवीन टूलचा वापर

बीएसएनलचा ४९९ चा फायबर बेसिक NEO ब्रॉडबँड प्लान आधीच आला आहे. या प्लॅनची ​​किंमत बाजारात ४९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु ऑफरवर तुम्हाला तो ४४९ मध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना बंपर सुविधा दिल्या जात आहेत. सर्वप्रथम, वापरकर्त्यांना ३००० जीबी पेक्षा जास्त इंटरनेट डेटा प्रदान केला जात आहे.

आणखी वाचा : Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या ‘या’ स्वस्त प्लॅन्समध्ये दररोज २ जीबी पर्यंत डेटा आणि मोफत काॅलिंगसह मिळेल बरचं काही…

४९९ रुपयांच्या प्लॅनचे फायदे

बीएसएनलच्या ४९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये यूजर्सना ३.३TB महिन्याचा डेटा दिला जात आहे. यामध्ये इंटरनेट स्पीड ४०Mbps आहे. त्याच वेळी, ३.३TB डेटा संपल्यानंतर, तुम्ही ४ Mbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकता.

अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा देखील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. एवढेच नाही तर पहिल्या महिन्याच्या रिचार्जवर यूजर्सना ९० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. बीएसएमएलच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.