भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन लॉंच केला आहे. बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची किंमत ३२१ रुपये आहे. या प्लॅनची ​​सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ३६५ दिवसांची म्हणजेच १ वर्षाची वैधता आहे. याचा अर्थ ३२१ रुपयांच्या रिचार्जवर बीएसएनएल सिम पूर्ण वर्षभर चालू राहील. पण बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन सामान्य ग्राहकांसाठी नाही. हे खास तामिळनाडूमधील पोलिस अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो…

३२१ रूपयंचा बीएसएनएल प्लॅन
३२१ रुपयांचा BSNL प्लॅन केवळ तामिळनाडूच्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहक इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही मोफत करू शकतात. मात्र ही सुविधा फक्त दोन पोलीस अधिकाऱ्यांमधील संभाषणासाठी आहे. यूजरने या फोन नंबरवरून इतर कोणत्याही व्यक्तीला कॉल केल्यास ७ पैसे प्रति मिनिट (स्थानिक BSNL नेटवर्कवर) आणि १५ पैसे प्रति मिनिट (STD कॉल) द्यावे लागतील. BSNL च्या या प्लॅनमध्ये दर महिन्याला कॉलिंग व्यतिरिक्त २५० SMS देखील उपलब्ध आहेत.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

आणखी वाचा : Disney Plus Hotstar Jio Fiber Airtel Xstream Broadband Plans: मोफत पाहा डिझ्ने प्लस हॉटस्टार, अनलिमिटेड कॉल आणि बरंच काही…

बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दरमहा १५ जीबी फ्री डेटा दिला जातो. हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे, जो बाजारात १ वर्षाच्या वैधतेसह येतो. ही योजना फक्त तामिळनाडूच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.

आणखी वाचा : तुमच्या फोनमधील हे धोकादायक Apps तुमचे बँक अकाउंट रिकामं करू शकतात…

या महिन्यात BSNL ने ‘आझादी के अमृत महोत्सव’ अंतर्गत २०२२ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. या रिचार्ज प्लॅनमध्ये दरमहा ७५ GB डेटा दिला जातो. प्लॅनमधील डेटा बेनिफिट फक्त ६० दिवसांसाठी आहे. यानंतर, ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी डेटा व्हाउचर खरेदी करावे लागतील. पॅकमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, डेटा स्पीड ४० Kbps पर्यंत कमी होईल. बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय दररोज १०० एसएमएस मोफत दिले जातात. सरकारी कंपनीने AzadiKaAmritMahotsavPV_2022 अंतर्गत ही योजना सुरू केली आहे. कृपया लक्षात घ्या की ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे आणि केवळ ३१ ऑगस्टपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल.