BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड ही आपल्या देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने ग्राहकांसाठी नवा ब्रॉडबँड प्लॅन सुरु केला आहे. या प्लॅनद्वारे बीएसएनएल यूजर्संना ४,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये वर्षभर सेवा ऑफर केली जाणार आहे. कंपनीने ही ऑफर मर्यादित काळापर्यंत सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठराविक कालावधीनंतर हा प्लॅन बीएसएनएल कंपनी बंद करु शकते. जर तुम्ही दीर्घकालीन प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा लॉन्ग-टर्म ब्रॉडबँड प्लॅन योग्य ठरु शकतो. सहा-बारा महिन्यांसाठी हा प्लॅन घेतल्यास तुम्ही डुअल-बॅंड वायफाय राउटर मिळवू शकता.

BSNL Broadband Plan

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी देशातील ठराविक भागामध्ये नवा फायबर एंट्री प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये २० एमबीपीएस स्पीड आणि १ टीबी मासिक डेटा समाविष्ट आहे. १ टीबी मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ४ एमबीपीएस पर्यंत पोहोचतो. हा बीएसएनएसचा बारा महिन्यांचा म्हणजेच एका वर्षासाठीचा ब्रॉडबँड प्लॅन आहे. ज्या भागांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे, तेथील ग्राहक हा प्लॅन १२ महिन्यांसाठी खरेदी करु शकता.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

या प्लॅनची किंमत ३,९४८ रुपये आहे. सोप्या शब्दात वर्षभरासाठी असलेला हा स्वस्त प्लॅन ग्राहक चार हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये विकत घेऊ शकणार आहेत. प्लॅन खरेदी केल्यावर इंटरनेट कनेक्शनसह मोफत लॅंडलाइन वॉयस कॉलिंग कनेक्शन दिले जाईल. जर तुम्ही वार्षिक प्लॅन फॉलो केलात, तर तुम्हाला बीएसएनएलतर्फ एक महिन्याची इंटरनेट सेवा विनामूल्य दिली जाईल. म्हणजेच तुम्हाला १३ महिन्यांचे इंटरनेट ४,००० रुपयांमध्ये मिळेल.

आणखी वाचा – Netflix चा मोठा निर्णय! कंपनीने पासवर्ड शेअर करण्यावर घातली बंदी, अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी भरावे लागतील जास्तीचे पैसे

(टीप – बीएसएनएलचा हा प्लॅन खरेदी करताना जीएसटी लागू होऊ शकते. त्यामुळे एकूण किंमतीमध्ये थोडी वाढ होऊ शकते.)