पंतप्रधान नरेंद्र यांनी भारतात १ ऑक्टोबर २०२२ पासून 5G इंटरनेट सेवा सुरु केली. या खासप्रसंगी Airtel ने निवडक शहरांमध्ये 5G सुरू केले आहे. तर रिलायन्स जीओने देखील या महिन्यासाठी 5G सादर करण्याची घोषणा केली आहे. या सगळ्यात आता BSNL ने 4G तसेच नवीनतम 5G सेवांसाठी घोषणा केल्या आहेत. त्यांनी 4G आणि 5G लॉन्चिंग सेवेची तारीखही जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दिवशी होणार लाँच

बीएसएनएल यूजर्ससाठी या वर्षी नोव्हेंबरपासून 4G सेवा उपलब्ध होईल तर BSNL ची 5G सेवा १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू होणार आहे अशी माहिती टेलिकॉम चेअरमन आणि सीएमडी पीके पुरवार यांनी दिली आहे. TCS आणि सरकारचे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT) यांच्या नेतृत्वाखालील एक संघ BSNL सोबत काम करत आहे जेणेकरून दूरसंचार कंपनीला देशांतर्गत 4G कोअर तंत्रज्ञान उपलब्ध होईल. जोपर्यंत 5G सेवांचा संबंध आहे, BSNL १५ ऑगस्ट २०२३ पासून नवीनतम नेटवर्क ऑफर करेल.

आणखी वाचा : 5G Launch In India: एअरटेल वापरकर्ते ‘या’ पद्धतीने घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद; जाणून घ्या टिप्स…

असे म्हणाले टेलिकॉम चेअरमन…

पुरवार यांनी भारतातील कथित कमी सरासरी महसूल वापरकर्त्यावरही भाष्य केले, ज्यामुळे बाजारातील स्थिरतेचा प्रश्न निर्माण होतो. देशात 4G सेवा सुरू झाल्यावर BSNL चे ARPU वाढले पाहिजे असे कार्यकारी अधिकारी मानतात. C-DoT ने आधीच स्वदेशी 5G कोर तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे आणि एकदा बीटा चाचणी सुरळीत झाली की BSNL 5G सेवा देऊ करेल.

5G योजना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील, असे सरकारने वारंवार सांगितले आहे आणि वैष्णव यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस कार्यक्रमात त्याची पुन्हा घोषणा केली. पंतप्रधानांनी असेही सांगून सूचित केले की, ‘पूर्वी 1GB डेटाची किंमत सुमारे ३०० रुपये होती, ती आता १० रुपये प्रति जीबीवर आली आहे. सरासरी, भारतातील एक व्यक्ती दरमहा १४GB वापरते. त्यासाठी दरमहा सुमारे ४,२०० रुपये खर्च येईल परंतु १२५-१५० रुपये खर्च येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl reveals big 4g 5g rollout plans for india pdb
First published on: 06-10-2022 at 14:32 IST