BSNL चा ‘हा’ प्लॅन Jio, Airtel आणि Vi पेक्षाही स्वस्त! ९० दिवसांची अतिरिक्त वैधता आणि बरेच काही

बीएसएनएलचे (BSNL) प्रीपेड प्लॅन खूप पसंत केले जात आहेत.

बीएसएनएलचा २,३९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन (photo credit: indian express)

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लॅन महाग झाले आहेत, अशा परिस्थितीत बीएसएनएलचे (BSNL) प्रीपेड प्लॅन खूप पसंत केले जात आहेत, कारण इथे यूजर्सना कमी किमतीत जास्त फायदे दिले जात आहेत. खाजगी दूरसंचार कंपन्यांनी केवळ किमती वाढवल्या नाहीत तर काही सर्कल्समधील फायदेही कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अनेक युजर्स बीएसएनएलकडे जात असल्याच्याही बातम्या आहेत. तसेच नेटवर्क स्विच करणाऱ्या ग्राहकांना मोफत डेटा देखील देत आहे.

बीएसएनएलचा २,३९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

गेल्या महिन्यातच, बीएसएनएल (BSNL) ने २,३९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काही अतिरिक्त ऑफर जाहीर केल्या आहेत. या प्लॅनसाठी वापरकर्त्यांना ९० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. ही ऑफर १५ जानेवारीला संपणार होती, परंतु टेलिकॉम कंपनीने ती सुरू ठेवली आहे. स्टँडर्ड ३६५ दिवसांच्या वैधतेऐवजी, बीएसएनएलने २३९९ रुपयांच्या पॅकसह रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांसाठी एकूण वैधतेच्या ४५५ दिवसांपर्यंत ऑफर देण्यात आलीय.

जिओचा २९९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या २९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

एअरटेलचा २९९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या २९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला दररोज २ जीबी डेटा मिळतो. ३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही आहे. प्लॅनसोबत, Amazon Prime Video च्या मोबाईल व्हर्जनची मोफत ट्रायल देखील ३० दिवसांसाठी उपलब्ध असेल.

व्होडाफोन आयडियाचा २८९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये दररोज १.५ जिबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट सारखे अतिरिक्त फायदे देखील आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsnl rs 2399 prepaid plan offering 90 days extra validity far better than jio airtel and vi check benefits scsm

Next Story
WhatsApp घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स; फोटो आणि व्हिडीओ एडिट करणं होणार सोपं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी