बीएसएनएल आपल्या वापरकर्त्यांना अनेक प्रीपेड योजना ऑफर करते ज्यात त्यांना ३० दिवसांची वैधता किंवा एक महिन्याची वैधता मिळते. यावेळी कंपनीने त्यांच्या दोन नवीन मासिक रिचार्ज योजनांची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडने जाहीर केले आहे की, २२८ रुपये आणि २३९ रुपयेच्या प्लॅन्स मध्ये पूर्ण महिन्याची वैधता मिळेल. या प्लान्सचे फायदे पाहता आज आम्ही तुम्हाला या प्लॅन्सची माहिती देणार आहोत जे हेवी डेटा यूजर्ससाठी बनवण्यात आले आहेत. इतकेच नाही तर हे प्लॅन रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या प्लॅनला टक्कर देताना दिसत आहेत. बीएसएनएलच्या या दोन नवीन प्रीपेड प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

BSNL १ महिना वैधता रिचार्ज

  • BSNL Rs २२८ प्रीपेड प्लॅन
  • BSNL Rs २३९ प्रीपेड प्लॅन

बीएसएनएलचा २२८ रुपयांचा प्लॅन

जर आपण बीएसएनएलच्या २२८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोललो तर ते मासिक वैधतेसह येते. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज २जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. डेटा संपल्यानंतरही, ग्राहकांना ८० Kbps वर डेटा मिळत राहील. एवढेच नाही तर प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनसह बीएसएनएल प्रोग्रेसिव्ह वेब अॅपवर चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेचा लाभही ग्राहकांना देत आहे.

( हे ही वाचा: BSNL चे ५ सर्वोत्कृष्ट रिचार्ज प्लॅन! जाणून घ्या सविस्तर माहिती)

बीएसएनएलचा २३९ रुपयांचा प्लॅन

आता बीएसएनएलच्या २३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलूया, त्यामुळे ग्राहकांना १० रुपयांच्या टॉकटाइमसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळत आहे. वापरकर्त्याच्या मुख्य खात्यात टॉकटाइम जोडला जाईल. त्याच वेळी, वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएससह २जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये २जीबी डेटा वापरल्यानंतर, इंटरनेट स्पीड ८० Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये गेमिंगचे फायदेही दिले जातात.

BSNL १ महिना वैधता रिचार्ज

ही योजना विशेष आहे कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची निश्चित वैधता नाही. म्हणजेच, या प्लॅनमध्ये दिवसांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु महिन्याचे जेवढे दिवस, तेवढ्या दिवसांसाठीच हा प्लॅन काम करेल. जर एका महिन्यात ३० दिवस असतील तर हा बीएसएनएलचा प्लॅन ३० दिवसांची वैधता देईल आणि जर ३१ दिवसांचा महिना असेल तर बीएसएनएलच्या या प्लॅनची ​​वैधता केवळ ३१ दिवसांची असेल. एकंदरीत, ज्या महिन्याच्या तारखेला बीएसएनएलचे हे रिचार्ज केले जाईल, हा प्लॅन पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेपर्यंत काम करेल.