देशात ५ जी सेवा सुरू झाली आहे. काही शहरांमध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दूरसंचार कंपन्यांकडून काही मोजक्या शहरांमध्ये ५ जी सेवा दिली जात आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. लवकरच संपूर्ण देशात ५ जी सेवा मिळणार आहे. मात्र, ही सेवा उपभोगण्यासाठी फोन ५ जी असणे गरजेचे आहे. तुम्ही ५ जी फोन घेण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला १५ हजार रुपयांखाली मिळणाऱ्या काही ५ जी फोन्सची माहिती देणार आहोत. हे फोन्स तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.

१) आयक्यूओओ झेड ६ ५ जी

iQOO Z6 5G या वर्षाच्या सुरुवातील लाँच झाला होता. तुमचे बजेट १५ हजार रुपयांपर्यंतचे असल्यास हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. फोनमध्ये ६.५८ इंच स्क्रिन मिळते. हा फोन अँड्रॉइड १२ वर चालतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीची स्टोअरेज देण्यात आली आहे. जलद कार्यासाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ६ एनएम प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच दीर्घकाळ काम करता यावे यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये तीन कॅमेरे असून प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

(ट्विटरवरील आवडता व्हिडिओ स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स)

२) रेडमी ११ प्राइम ५ जी

Redmi 11 Prime 5G या फोनमध्ये गुणवत्तापूर्ण छायाचित्रे काढण्यासाठी ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम असून ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते. सेल्फी काढण्यासाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन तुम्हाला १३ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

३) सॅमसंग गॅलक्सी एफ २३ ५ जी

Samsung Galaxy F23 5G  फोनमध्ये ६.६ इंचचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले असून ५० मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले असून ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज असेलेला व्हेरिएंट तुम्हाला १४ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

(ट्विटरवर अक्षर मर्यादा वाढणार की, वेगळे काही होणार? मस्क यांनी केले ‘हे’ सूचक ट्विट)

4) रिअलमी ९ आय ५ जी

Realme 9i 5G  मध्ये ६.६ इंचचा डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असून सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेला व्हेरिएंट १४ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे.

५) पोको एम ४ प्रो ५ जी

POCO M4 Pro 5G बजेट फोनमध्ये ६.६ इंचचा फुल एचडी डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली असून त्यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० प्रोसेसर देण्यात आले आहे.