अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा नागरिकांसाठी आनंदोस्तवच ठरला आहे. या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक उपकरणे, वस्तू या माफक दरात सवलतीसह मिळत असल्याने लोकांची भरपूर बचत होत आहे. विशेष म्हणजे, या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सेलमध्ये काही स्मार्टफोन दमदार ऑफरसह मिळत आहेत. यातील काही बेस्ट सेलिंग स्मार्टफोनबाबत आपण जाणून घेऊया. मोठ्या ऑफरसह हे फोन तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1) सॅम्संग गॅलक्सी एम १३

Samsung Galaxy M13 या फोनची लिस्टेड किंमत ९ हजार ४९९ रुपये इतकी आहे. मात्र, अमेझॉनने या फोनवर मोठी सूट दिल्याने त्याची किंमत ९ हजार ४९९ इतकी झाली आहे. तसेच एसबीआयच्या डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला या फोनवर ७५० रुपयांपर्यंतची तातडीची सूट देखील मिळणार आहे.

(वायरलेस चार्जिंग असणाऱ्या वनप्लसच्या ‘या’ 5 G फोनवर ११ हजारांची सूट, पण ऑफर केवळ या तारखेपर्यंतच)

फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. अधिक वेळ वापर करता यावा यासाठी फोनमध्ये ६ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये रॅम प्लसचा पर्याय आहे, याने रॅम ८ जीबी पर्यंत वाढवता येते. फोनच्या मागील भागात तीन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात ५० मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आहे.

२) रेडमी ए१

Redmi A1 या फोनची लिस्टेड किंमत ८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र हा फोन ६ हजार २९९ रुपये इतक्या कमी किंमतीत मिळत आहे. या बजट स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर, फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा एआई ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला लेदर टेक्सचर डिझाईन आहे. १६.५६ सेंटिमीटर एचडी डिस्प्ले बरोबर मीडियाटेक हेलिओ ओ २२ प्रोसेसरसह हा फोन ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी उपलब्ध आहे.

३) रेडमी नाईन अ‍ॅक्टिव्ह

Redmi 9 Activ या फोनची लिस्टेड किंमत १० हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र फोनवर २६ टक्क्यांची सूट दिल्याने त्याची किंमत ८ हजार ९९ इतकी झाली आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये गतीशील कार्यासाठी ऑक्टाकोर हेलियो प्रोसेसर देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर १३ आणि २ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ५ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी आहे.

(रोबोटने केवळ इतक्या सेकंदात पार केले १०० मीटर अंतर, गिनीज बूकमध्ये नोंद, पाहा व्हिडिओ)

४) आयक्यूओओ झेड ६ लाईट ५जी

देशात काल ५ जी सेवेचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे ५ जी फोन्सची मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर iQOO Z6 Lite 5G हा ५ जी सेवेचा लाभ घेण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. फोनची लिस्टेड किंमत १५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र १३ टक्क्यांच्या सूटनंतर फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. एसबीआयचे डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला अतिरिक्त ७५० रुपयांपर्यंतची सूट मिळते. फोनमध्ये ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण छायाचित्र काढण्यासाठी फोनला मागे ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

५) आयक्यूओओ झेड ६

iQOO Z6 5G या दमदार फोनची किंमत १९ हजार ९९० इतकी आहे. मात्र तो १४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये १२ हजार ६५० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट तुम्हाला मिळू शकते. फोनमध्ये फूल एचडी अमोलेड डिस्प्ले, स्नॅप ड्रॅगन ६८० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात ४४ वॉटचा फ्लॅश चार्जर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच त्याच स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देखील आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget smartphones on amazon with big discount ssb
First published on: 02-10-2022 at 11:33 IST