आजकाल ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्सची विक्री सुरू आहे. फ्लिपकार्टवर हा सेल १७ जुलैपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. जर तुम्ही शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेल दरम्यान अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. फ्लिपकार्टवर चालू असलेल्या सेल दरम्यान Oppo K10 5G स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. Oppo K10 5G स्मार्टफोनच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फोन ४८एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, ५०००एमएएच बॅटरी आणि मिडीयाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. येथे आम्ही तुम्हाला Oppo K10 5G स्मार्टफोनवरील डिस्काउंट, स्पेसिफिकेशन्स आणि फोनच्या फीचर्सबद्दल तपशीलवार माहिती देत ​​आहोत.

Oppo K10 5G ऑफर

Oppo K10 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर १७,४९९ रुपयांना लिस्ट झाला आहे. या ओप्पो फोनवर बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांची सूट मिळत आहे. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक हा फोन फक्त १५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यासोबतच SBI क्रेडिट कार्डवर ५०० रुपये, EMI व्यवहारांवर १५०० रुपयांची सूट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर ओप्पोच्या या ५जी स्मार्टफोनवर जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते.

( हे ही वाचा: आता इन्व्हर्टरशिवाय ‘हे’ LED Bulbs तासनतास चालतील! किंमत आहे १०० रुपयांनीही कमी)

OPPO K10 5G तपशील

  • ९०Hz रिफ्रेश रेटसह ६.५६ इंच HD+ LCD पॅनेल
  • मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० प्रोसेसर
  • ५०००mAh बॅटरी, ३३वोल्ट जलद चार्ज
  • ८जीबी + ५जीबी रॅम, १२८जीबी स्टोरेज
  • ४८एमपी + २एमपी ड्युअल रियर कॅमेरा
  • ८एमपी सेल्फी कॅमेरा शूटर
  • अँड्रॉइड १२ वर आधारित ColorOS 12.1

OPPO K10 5G स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये LCD डिस्प्ले पॅनल आहे, ज्याचा रिफ्रेश दर ९०Hz आहे. हा ओप्पो फोन मिडीयाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन ५००० mAh बॅटरी आणि ३३वोल्ट SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह समर्थित आहे. यासोबतच OPPO K10 5G स्मार्टफोनमध्ये १२८जीबी स्टोरेज आणि ८जीबी रॅम आहे. या फोनची रॅम ५जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

( हे ही वाचा: ३४,९९९ रुपयांमध्ये लाँच होणार Nothing Phone (1); जाणून घ्या सविस्तर माहिती)

OPPO K10 5G च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा ४८एमपी आहे, ज्यामध्ये २एमपी चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या Oppo फोनमध्ये ८एमपी सेल्फी कॅमेरा आहे. OPPO K0 5G स्मार्टफोन अँड्रॉईड १२ वर आधारित Color OS 12.1 वर चालतो. या ओप्पोफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.