Smartphone Offer: देशात 5G सेवा सुरू झाली असून यासह 5G स्मार्टफोनची विक्री देखील वेगाने वाढू लागली आहे. 5G फोन आधीच बाजारात उपलब्ध आहेतच. शिवाय, असेही सांगण्यात येत आहे की, आता स्वस्त 5G फोन देखील बाजारात येऊ शकतात. तुम्ही सध्या एक चांगला लो-बजेट 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सॅमसंगच्या ‘Galaxy M33 5G’ स्मार्टफोनवर ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India सूट मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी मिळेल ही खास ऑफर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कशी मिळेल ऑफर?
हा हँडसेट सवलतीत खरेदी करण्यासाठी, तुम्हाला फक्त अॅमेझाॅनच्या वेबसाइटवर किंवा त्याच्या मोबाईल ऍप्लिकेशनला भेट देऊन आणि फोन शोधून ऑर्डर करावा लागेल. आणि तुम्ही ऑर्डर करताच, तुम्हाला ते फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळेल, ज्याचा तुम्ही रोजच्या जीवनात सहज फायदा घेऊ शकता.

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन Amazon वर तब्बल २४ टक्के सूटसह उपलब्ध आहे. यामुळे फोनची किंमत १८,९९९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय Amazon फोनवर १८, ००० रुपयांची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे.

(आणखी वाचा : अरे वा! ‘या’ दमदार 5G स्मार्टफोनवर होणार तुमच्या पैशांची बचत; लगेच पाहा कुठे मिळतेय ही ऑफर )

Galaxy M33 5G असा आहे खास

Galaxy M33 5G मध्ये ५ MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २MP मायक्रो लेन्ससह ५० MP मुख्य कॅमेरा सेटअप आहे. तर, फोनमध्ये सेल्फीसाठी ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याची मॅक्रो लेन्स अतिशय तपशीलवार क्लोज-अप शॉट्स घेते. तर फ्रंट कॅमेरा एआर फन मोडसह येतो. Galaxy M33 5G 5nm आधारित चिपसेटद्वारे समर्थित आहे, जो २.४ GHz आणि ८ कोरच्या गतीने सुसज्ज आहे. हा प्रोसेसर सुपर फास्ट कार्यक्षमतेची खात्री देतो. Device १६GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देते. पॉवरसाठी, यात ६००० mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy samsung galaxy m33 5g smartphone for just rs 999 pdb
First published on: 21-11-2022 at 16:33 IST