नोहेंबर २०२२ मध्ये ChatGPT लाँच झाले. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचारलेत त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. पण एखादी गोष्ट जास्त लोकप्रिय झाल्यास त्यावरून पैसे मिळवण्याचे लोक वेगवेगळा विचार करतात. त्यामुळे प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर अनेक बनावट अ‍ॅप सुरु झालेत हे आश्चर्यकारक नाही. अन्यथा विनामूल्य उत्पादनासाठी शुल्क आकारून लोकांची फसवणूक करतात.आता प्ले स्टोअरवर बनावट चॅटजीपीटी सुद्धा येऊ लागले आहे.

तुम्ही प्लेस्टोअरवर चॅटजीपीटी सर्च केल्यास अनेक बनावट अ‍ॅप दिसत आहेत. उदाहरणार्थ, “ChatGPT Chat GPT AI with GPT-3” नावाच्या अ‍ॅपमधील एकाने अ‍ॅपस्टोअरमधून काढून टाकण्यापूर्वीच हजारो सकारात्मक रिव्ह्यू त्याने मिळविली आहेत. गुगल प्ले स्टोअरवर “चॅटजीपीटी” शोधल्याने त्यांच्या नावातील कीवर्डसह अनेक ऍप्लिकेशन्स परत येतात.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Rashmika Mandanna and Ranbir Kapoor in Animal
‘ॲनिमल’मधल्या करवा चौथच्या सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली, “१० सेकंदाचा डायलॉग..”
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
Thief Doing Yoga Before Robbery Funny Video
“पैशांपेक्षा शरीर जास्त महत्वाचं” चोरानं दुकानं फोडण्यापूर्वी केला योगा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भारतात आजपासून Samsung Galaxy F04च्या विक्रीला होणार सुरुवात; जाणून घ्या फीचर्स

तुम्हाला प्रत्येकवेळी चॅटजीपीटी वेबसाईटवर जाणे पसंत नसल्यास त्याऐवजी एखादे अ‍ॅप वापरू शकता. अधिकृत चॅटजीपीटी वापरण्याचा हा फायदा असतो तो म्हणजे त्यावर जाहिराती येत नाहीत.

१.तुमच्या फोनमधील क्रोम वर जाऊन chat.openai.com उघडा.
२. openai या अकाउंटवर लॉग इन करा.
३. जेव्हा तुम्हाला चॅटजीपीटी दिसेल तेव्हा उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
४. शॉर्टकट तयार करण्यासाठी “होम स्क्रीनवर” आणण्यासाठी क्लिक करा.

हेही वाचा : OnePlus 12 Pro 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? मिळतेय मोठी सूट

तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवर बनावट चॅटजीपीटी आढळून आल्यास त्याच्या लिसिटनग पेजवर जाऊन उजवीकडुल असणाऱ्या तीन बिंदूवर क्लॉक करावे. नंतर ते चुकीचे आहे म्हणून त्यावर क्लिक करावे. तीथे तुम्हाला हे का चुकीचे वाटले याचे कारण विचारले जाईल तेव्हा तिथे ‘कॉपीकॅट’ असे उत्तर द्यावे.