Cheapest Recharge Plan: तुमच्यासाठी आज आम्ही एका खास रिचार्ज प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. आम्हाला कल्पना आहे की, दर महिन्यात महागडे रिचार्ज प्लॅन घेऊन तुम्ही कंटाळला असाल. पण, चिंता करू नका. नेहमीप्रमाणे याही वेळी आम्ही तुमच्या फायद्याचा प्लॅन आणला आहे. तुम्हीदेखील महागड्या रिचार्ज प्लॅनला कंटाळला असाल आणि जास्त वॅलिडीटीचा प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणलाय. BSNL ही देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत BSNL त्यांच्या युजर्सना अनेक फायदे ऑफर करते. इतर टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करत असतानाच BSNL ने अनेक कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.

बीएसएनएलने यूजर्ससासाठी ७५० रुपयांचा नवीन प्लॅन आणून मोठा धमाका केलाय. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना १८० दिवसांची वैधता दिली जातेय. म्हणजेच तुम्ही या परवडणाऱ्या किंमतीत संपूर्ण सहा महिने रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. यामुळे मोबाईल क्रमांक बंद होण्याचे टेन्शनही संपेल. बीएसएनएलने त्यांच्या GP2 यूजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन आणलाय. रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर ७ दिवसांपर्यंत रिचार्ज करत नाहीत, ते जीपी2 अंतर्गत येतात.

बीएसएनएलच्या ७५० रुपयांच्या प्लॅनचे काय फायदे आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या प्लानमध्ये ग्राहकांना १८० दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत कॉलिंग मिळेल. यासोबतच कंपनी सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कसाठी दररोज १०० मोफत एसएमएस मिळतायत. या प्लॅनद्वारे तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय दररोज अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला १८० दिवसांच्या वॅलिडीटीसाठी १८० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच तुम्ही या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी पर्यंत हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरू शकता. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही इंटरनेट वापरू शकाल. पण या काळात तुम्हाला फक्त ४०kbps च्या वेगाने डेटा कनेक्टिव्हिटी मिळेल.