रिलायन्स जिओचे प्रीपेड प्लॅन १०० रुपयांपासून सुमारे ५००० रुपयांपर्यंत आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये १ GB, १.५ GB डेली डेटा ते ३ GB डेटा दररोज ऑफर केला जातो. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओकडे ग्राहकांसाठी परवडणाऱ्या अनेक योजना आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्‍या जिओ प्रीपेड प्‍लॅनबद्दल सांगत आहोत जे टॉप ट्रेंडिंग आणि बेस्ट सेलिंग रेंजमध्‍ये येतात. Jio च्या ४९९, ३३३ आणि २९९ च्या प्रीपेड प्लॅनबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

४९९ रूपयांचा Disney+ Hotstar प्लॅन४९९ रुपयांच्या Jio प्रीपेड प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण ५६ GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.
याशिवाय Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

आणखी वाचा : Vivo V25E स्मार्टफोन लवकरच भारतात दाखल होईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…

३३३ रूपयांचा  Disney+ Hotstar प्लॅनरिलायन्स जिओच्या ३३३ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण २८ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. यासोबतच प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सदस्यत्व प्लॅनमध्ये मोफत उपलब्ध आहे.

सगळ्यात बेस्ट २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनजिओचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन सर्वाधिक विकला जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दररोज दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण ५६ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ Kbsp वेगाने वापरता येईल. या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.