Jio Number पोस्टपेड वरून प्रीपेड मध्ये रूपांतरित करायचाय? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

जाणून घ्या जिओचा पोस्टपेड नंबर प्रीपेड मध्ये रूपांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

how to convert jio postpaid to prepaid
जिओ पोस्टपेड नंबर प्रीपेडमध्ये रूपांतरित करा( फोटो: financial express)

How To Convert Jio Pospaid To Prepaid: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओचे सध्या भारतीय टेलिकॉम उद्योगात सर्वाधिक ग्राहक आहेत. अलीकडेच, ट्रायच्या अहवालात असे समोर आले आहे की जिओचे एकूण ४०६ दशलक्ष वापरकर्ते आहेत. त्यामुळे, कंपनी वेळोवेळी आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी तसेच प्रीपेड वापरकर्त्यांसाठी नवीन आणि उत्तम योजना (Jio Plan) ऑफर करत असते. परंतु, जिओ वापरकर्त्यांना जिओ पोस्टपेडपेक्षा प्रीपेड प्लॅनमध्ये अधिक फायदे मिळतात. हे लक्षात घेऊन, आज आम्ही जिओचा पोस्टपेड नंबर प्रीपेड (Jio पोस्टपेड ते प्रीपेड) मध्ये रूपांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत.

जिओ पोस्टपेड ते प्रीपेड कसे करायचे?

तर जाणून घेऊया प्रक्रियेबद्दल ज्याचे अनुसरण करून तुम्ही कोणताही जिओ पोस्टपेड नंबर प्रीपेडमध्ये बदलू शकता. इतकेच नाही तर हे सर्व करण्यासाठी यूजर्सला नंबर बदलण्याची किंवा नवीन सिम घेण्याचीही गरज भासणार नाही. पोस्टपेड नंबर फक्त १ तासात प्रीपेड होईल.

जिओ पोस्टपेड नंबर प्रीपेडमध्ये कसे रूपांतरित कराल?

  • वापरकर्त्यांना प्रथम त्यांच्या जिओ पोस्टपेड नंबरवर उपस्थित असलेली सर्व बिले क्लियर करावी लागतील.
  • बिल क्लिअर केल्यानंतर यूजर्सला जवळच्या जिओ स्टोअरला भेट द्यावी लागेल.
  • जिओ स्टोअरमध्ये उपस्थित असलेले जिओ एक्झिक्युटिव्ह तुम्हाला यामध्ये मदत करतील.
  • हा नंबर २४-४८ तासांत पोस्टपेडवरून प्रीपेडमध्ये हस्तांतरित केला जाईल.
  • जर तुम्ही J&K चे रहिवासी असल्यास, तर ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १० दिवस लागू शकतात.
  • या प्रक्रियेत तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत. परंतु, तुम्हाला प्राइम मेंबरशिप चार्ज आणि ९९ रुपयांचे रिचार्ज शुल्क भरावे लागेल.

( हे ही वाचा: Jio Phone recharge plans list 2022 : येथे पहा सर्व रिचार्ज आणि फायदे एकाच वेळी)

प्रीपेड नंबरचे फायदे

जिओ पोस्टपेड वापरकर्त्यांना सिक्योरिटी डीपॉजीट भरावी लागते. मात्र, ही परत करण्यायोग्य रक्कम असते. जेव्हा जेव्हा वापरकर्ता जिओ सोडतो तेव्हा त्याचे सुरक्षा खाते परत केले जाईल. तुम्हाला ही सुरक्षा ठेव टाळायची असेल, तर वर नमूद केलेल्या पायऱ्या फॉलो करा.

जिओ नंबर प्रीपेड किंवा पोस्टपेड हे कसे तपासाल ?

बर्‍याचदा यूजर्सना माहित नसते की त्यांचा जिओ नंबर प्रीपेड आहे की पोस्टपेड. हे शोधण्याचा मार्ग सोपा आहे. यासाठी तुम्हाला माय जिओ अॅपवर जाऊन माय प्लॅन वर जावे लागेल आणि येथे तुम्हाला तुमचा नंबर प्रीपेड आहे कि पोस्टपेड याची माहिती मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Convert jio number from postpaid to prepaid learn the easiest way gps

Next Story
नवीन फीचर्ससह Chrome OS Beta 104 आणि Chrome OS 103 लवकरच होणार रिलीज; गुगलने केली घोषणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी