Apps that can harm your Phone: तुम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये Google Play Store वरून Android Apps डाउनलोड केले असतील जे तुम्हाला मजेदार वाटले असतील, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. संशोधकांनी अँड्रॉइड ॲप्सची एक नवीन यादी जारी केली आहे जी युजर्सचा डेटा आणि पैसे चोरण्यासाठी मॅलिशस टायटल वापरत आहेत. हे ॲप्स तुमच्या स्मार्टफोनमध्येही असतील तर ते लगेच डिलीट करा. यापैकी बहुतेक ॲप्स आधीच अधिकृतपणे Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. PhoneArena ने आपल्या अहवालात ही यादी जाहीर केली आहे.

चला या मॅलिशस  Android ॲप्सबद्दल जाणून घेऊया…

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
  1. Document Manager
  2. Coin track Loan – Online loan
  3. Cool Caller Screen
  4. PSD Auth Protector
  5. RGB Emoji Keyboard
  6. Camera Translator Pro
  7. Fast PDF Scanner
  8. Air Balloon Wallpaper
  9. Colorful Messenger
  10. Thug Photo Editor
  11. Anime Wallpaper
  12. Peace SMS
  13. Happy Photo Collage
  14. Original Messenger
  15. Pellet Messages
  16. Smart Keyboard
  17. Special Photo Editor
  18. 4K Wallpapers

आणखी वाचा : रिलायन्स जिओचा स्वस्तात मस्त प्लॅन, ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत अनलिमिटेड कॉल, फ्री OTT सब्सक्रिप्शन

मॅलिशस ॲप्स टाळण्याचे मार्ग 

  • अशा मॅलिशस ॲप्स आणि मालवेअरला तुमच्या Android फोनमधून नेहमी बाहेर ठेवण्याचा कोणताही सरळ मार्ग नाही. परंतु जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स वापरू शकता.
  • फक्त Google Play Store सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडून ॲप्स वापरून पाहा आणि डाउनलोड करा.
  • सायबरसुरक्षा तज्ञांनी सुचवलेले किंवा तुम्हाला अगदी कमी दुर्भावनायुक्त वाटतील असे सर्व ॲप्स हटवा. 
  • ॲप डाउनलोड करण्यापूर्वी कृपया ॲवरेज यूजर रेटिंग स्कोर आणि काही यूजर रिव्यू एकदा वाचा.