देशात डिजिटल व्यवहारांची लोकप्रियता आणि त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी डिजिटल व्यवहार सोपे आणि सोईचे असल्याचे चित्र सगळीकडे दिसते. असे असले तरी डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. सायबर गुन्हेगारांकडून लाखो नागरिकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सरकरूकडून जनजागृती करूनदेखील काही नागरिक या घोटाळ्यामध्ये अडकत आहेत. अशी अनेक प्रकरणे रोज देशभरात घडत असतात. आताही असेच एक प्रकरण समोर आले आहे. हे दिल्लीमध्ये घडलेले प्रकरण आहे. यामध्ये एका व्यक्तीने अज्ञात लिंकवर क्लिक करून आयुष्यभर मेहनत करून कमावलेले ९ लाख रुपये गमावले आहेत. या व्यक्तीची फसवणूक कोणत्या कारणांमुळे झाली आणि हे प्रकरण नक्की काय आहे ते समजून घेऊयात.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

हेही वाचा : विश्लेषण : भारतात वाढू लागलेत सायबर हल्ले! सायबर सुरक्षेचे आव्हान किती खडतर?

दिल्लीमधील पितमपुरा भागातील रहिवासी असणारे हरिन बन्सल हे सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत असताना त्यांना एक पोस्ट दिसली. ज्यामध्ये वर्क फ्रॉम होम बद्दल काहीतरी मजूकर होता. तसेच या पोस्टमध्ये वर्क फ्रॉम होमच्या कामांमधून चांगले पैसे देखील मिळतील असे लिहिले होते. या पोस्टबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी बन्सल यांनी त्या लिंकवर क्लिक केले जिथून लिंक थेट WhatsApp वर रीडायरेक्ट झाली. तेथे एका अज्ञात व्यक्तीने हरिन बन्सल यांना एका वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले.

या वेबसाईटवर हरीन बन्सल यांना पैसे जमा करून नंतर काढण्यास सांगितले होते जेणेकरून त्यांना त्यावर कमिशन मिळू शकेल. सुरुवातीला जेव्हा त्या व्यक्तीने हे केले तेव्हा त्याला कमिशन मिळाले. जेव्हा घोटाळेबाजाला वाटले की बन्सल यांना कामाची खात्री पटली आहे, तेव्हा त्याने हरीन बन्सल यांना त्यात आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले. जेव्हा बन्सल यांनी त्या साईटवर ९ लाख ३२ हजार रुपये गुंतवले तेवझं त्यांना ते पैसे काढता आले नाहीत. यानंतर बन्सल यांना कळेल कि आपण सायबर क्राईममध्ये फसलो आहोत.

हेही वाचा : Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक

यानंतर हरिन बन्सल यांनी संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितले आणि अज्ञात लोकांविरोधात तक्रर दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना अटक केली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.