जगातील सर्वात मोठी कंपनी Apple ने त्यांच्या कंपनीच्या सीईओ टीम कुक यांना नवीन वर्षातच एक धक्का दिला आहे. Apple ने टीम कुक यांच्या पगारामध्ये ४० टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे त्यांचा पगार आता ४.९ करोड डॉलर एवढा झाला आहे. मागच्या वर्षी आयफोन तयार करणाऱ्या अ‍ॅपल कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. तसेच कंपनीचे मार्केट कॅप देखील कमी झाले होते. ब्लूमर्गच्या एका अहवालानुसार टीम कुक याना यावर्षी ४.९ करोड डॉलर (चार अरब रुपये) इतका पगार मिळणार आहे. आपल्या पगारामध्ये घट करण्याची विनंती टीम कुक यांनीच कंपनीला केली होती.

नवीन व्यवस्थेनुसार, टिम कुककडे असलेल्या स्टॉक युनिट्सची टक्केवारी ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे स्टॉक अ‍ॅपलच्या कामगिरीशी संबंधित आहेत. टीम कुक यांचे पॅकेज हे कंपनीच्या शेअरहोल्डर, अ‍ॅपलच्या कामगिरीवर या सगळ्यांवर ठरवले जाते. जरी काही भागधारकांनी त्यांचे समर्थ केले असले तरी गेल्या वर्षी कंपनीच्या भागधारकांनी टीम कुक यांच्या पॅकेजवर टीका केली होती.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

हेही वाचा : Airtel-Jio-Vi Postpaid OTT Plan: एक वर्ष हॉटस्टार, Amazon Prime फ्री अन्…;

मागच्या वर्षी कुक यांची इक्विटी अवॉर्डची किंमत ७.५ कोटी डॉलर होती. २०२३मध्ये त्यांचे पॅकेज कंपनीच्या स्टॉकच्या कामगिरीवर कमी जास्त होऊ शकते. टीम कुक यांनीच त्यांचे पॅकेज कमी करण्याची विनंती कंपनीकडे केली होती. कुक याना मागच्या वर्षी ६० लाखांचा बोनस मिळाला होता. तर त्यांना इक्विटी अवॉर्डच्या रूपात ४ कोटी डॉलर मिळाले होते.

हेही वाचा : २०० दशलक्ष लोकांचा डेटा चोरी झाल्याचा दावा Twitterने फेटाळला

Apple च्या शेअर्समध्ये घसरण

Apple कंपनीने चीफ फायनान्शिअल ऑफिसर लुका मेस्त्री, जनरल काउंसिल केट अॅडम्स, रिटेलचे प्रमुख डियर्डे ओ’ब्रायन आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ विल्यम्स यांचे देखील पॅकेज उघड केले आहेत.या सर्व अधिकाऱ्यांना २०२२ मध्ये सुमारे २७ दशलक्ष डॉलर इतके पॅकेज बोनससह देण्यात आले होते. Appleच्या शेअर्समध्ये मागच्या वर्षी २७ टक्क्यांनी घसरण झाली होती.