scorecardresearch

Apple : Iphone 14 आणि 14 Plus मधील ‘हे’ फरक जाणून घ्या, निवड करणे सोपे जाईल

अॅप्पलने आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस लाँच केला. या दोन्ही फोनमध्ये काय अंतर आहे, यातील फिचर्स किती सारखे आहेत, तसेच या दोन्ही फोनची किंमत काय आहे?याबाबत आणि जाणून घेऊया.

Apple : Iphone 14 आणि 14 Plus मधील ‘हे’ फरक जाणून घ्या, निवड करणे सोपे जाईल
आयफोन

कालच अ‍ॅप्पलने आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. हा लाँच इव्हेंट कुण्या उत्सवापेक्षा कमी नव्हता. आयफोनचे चाहते आतुरतेने याकडे बघत होते. अ‍ॅप्पलने आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस लाँच केला. या दोन्ही फोनमध्ये काय अंतर आहे, यातील फिचर्स किती सारखे आहेत, तसेच या दोन्ही फोनची किंमत काय आहे? याबाबत जाणून घेऊया.

कंपनीच्या आयफोन सिरीजमध्ये आयफोन १४, आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. कंपनीने या वर्षी कॉम्पॅक्ट मॉडल एवजी प्लस मॉडल लाँच केला आहे. आयफोन १४ आणि १४ प्रो या दोन्ही फोन्समध्ये तुम्हाला ए १६ बायोनिक प्रोसेसर ऐवजी ए १५ बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे. याला गेल्या वर्षी लाँच करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे यांच्या फिचर्समध्ये काही जास्त फरक नाहीये, मात्र किंमतीत १० हजार रुपयांचा अतंर आहे.

(Apple Event 2022 : iPhone 14 आणि iPhone 14 Pro बरोबरच Apple Watch, AirPod ची घोषणा; जाणून घ्या भन्नाट फिचर्स आणि किंमत)

आयफोन १४ प्लस मध्ये मोठी स्क्रिन

जर तुम्हाला मोठी स्क्रिन आवडत असेल तर तुम्ही आयफोन १४ घेऊ शकता. Apple iPhone 14 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. दुसरीकडे, iPhone 14 Plus मध्ये या डिस्प्लेचा आकार 6.7 इंच आहे. दोन्ही फोनमध्ये हा डिस्प्ले ट्रुटोन कलर सपोर्ट आणि 800 एनआयटीएसच्या पीक ब्राइटनेससह येतो. मोठी स्क्रिन हवी असेल तर आयफोन १४ योग्य चॉइस ठरेल.

दोन्ही फोन्सच्या बॅटरी लाइफमध्य अंतर

आयफोन १४ प्लसमध्ये 26 तासांपर्यंत बॅकअप मिळेल. तर अ‍ॅप्पल १४ मध्ये २० तासांपर्यंत बॅकअप मिळेल. या दोन्ही फोन्सच्या चार्जिंग स्पीडमध्ये कोणताही फरक नाही. ते 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतात. दोन्ही फोन्समध्ये ६ तासांचा बॅटरी बॅकपचा फरक आहे. फोनचा अधिक वेळ यूज करणाऱ्यांना आयफोन १४ प्लस सोयिस्कर ठरू शकतो.

इतर फिचर्समध्ये खास फरक नाही

दोन्ही फोन्समध्ये १२८ जीबीपासून ते ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. यात आयओएस १६ सह १२ मेगापिक्सलचा ड्यूअल कॅमेरा मिळतो, ज्यात १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. सारखी चीपसेट असल्याने यांची कामगिरी देखील एकसारखीच असणार आहे. दोन्ही फोन्समध्ये सॅटेलाइटच्या माध्यमातून इमरजेन्सी एसओएस आणि क्रॅश डिटेक्शन फिचर देण्यात आला आहे. भारतात आयफोन १४ ची किंमत ७९ हजार ९०० तर आयफोन १४ ची किंमत ८९ हजार ९०० पासून सुरू होते.

(iphone 14 च्या लाँचपूर्वीच ‘हा’ आयफोन ७ हजारांनी मिळतोय स्वस्त, ‘हे’ केल्यास अजून १० हजार वाचतील)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Difference between apple iphone 14 and apple iphone 14 plus ssb

ताज्या बातम्या