आपल्या देशामध्ये रोज लाखो नागरिक विमानाने देशांतर्गत व देशाबाहेर प्रवास करत असतात. मात्र या नागरिकांना प्रवास करताना एक अडचण सतत सतावते ती म्हणजे त्यांना विमानतळावर चेकइन करण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागते. म्हणजे विमानाने एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा जास्त वेळ कधीकधी विमानतळावर चेकइन/ चेकिंगसाठी लागतो. नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने डिजीयात्रा (DigiYatra App) अ‍ॅपची सुरुवात केली आहे.

देशातील काही विमानतळावर ही सुविधा सुरु करण्यात आली असून त्यामध्ये आता कोलकाता विमानतळाचा समावेश झाला आहे. या App च्या माध्यमातून आता प्रवासी पेपरलेस पद्धतीने फ्लाईटसाठी बोर्डिंग करू शकणार आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी सहजपणे डिजिटली चेकइन करू शकतात. तसेच १ डिसेंबर २०२२ रोजी या Digi yatra App ची सुरुवात DGCA कडून करण्यात आली आहे. सध्या देशातील दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसीमधील लालबहादूर शास्त्री विमानतळ आणि बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे Digi Yatra App ची सुविधा उपलब्ध आहे.

pune to dubai flight marathi news
दुबईतील पावसाचा पुणेकर हवाई प्रवाशांना बसतोय फटका
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
AAI JE 2024 registration begins for 490 Junior Executive
AAI JE 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, १ मेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

हेही वाचा : मोबाइलनंतर डेस्कटॉप व्हर्जनसाठी लॉन्च झाले Google चे ‘हे’ फिचर, जाणून घ्या फायदे

या अ‍ॅपच्या माध्यमातून आम्ही तिकीट व्हेरीफिकेशनची वेळ कमी करू शकू. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि विमानतळावर बोर्डिंग करणे सोपे होईल हाच आमचा उद्देश असल्याचे कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने डिजी प्रवास अ‍ॅपची सुविधा सुरू झाल्यावर सांगितले. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे Digi yatra app सुविधा सुरक्षा क्षेत्र १, २, ३ आणि १८,१९,२०,२१,२२ आणि २३ या बोर्डिंग गेट्सवर उपलब्ध असणार आहे.

डिजी यात्रा म्हणजे नेमकं काय?

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या मते, डिजी यात्रा हे मोबाईल वॉलेट आधारित ओळख प्लॅटफॉर्म आहे. जे कोणत्याही प्रवाशाच्या तपशीलाची पडताळणी करण्यात मदत करेल. हे खूपच कमी पैशात काम करेल आणि प्रवाशांना त्यांचे वैयक्तिक तपशील जतन करण्यास देखील मदत करेल. डिजी यात्रा फाउंडेशन (DYF) अंतर्गत सर्व प्रवाशांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आणि विमानतळ चेक-इन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘डिजी यात्रेची मदत होणार आहे. यापूर्वी चेक इनसाठी प्रवाशांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागायचे. मात्र, ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना चेक इन करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.

डिजी यात्रा अ‍ॅपसाठी कसे कराल रजिस्ट्रेशन?

१. डीजी यात्रा अ‍ॅप वापरण्यासाठी पहिल्यांदा हे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनवर किंवा आयफोनवर डाउनलोड करा.
२. यानंतर अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकावा.
३. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो त्या app मध्य टाकावा.
४. त्यानंतर तुमचा अड्रेस प्रूफ देण्यासाठी DigiLocker वरून तुमची आधारकार्ड मधील माहिती समाविष्ट करावी.
५.त्यापुढील प्रोसेस करत असताना तुम्ही तुम्हाला सेल्फी काढून अ‍ॅपमध्ये सबमिट करावा लागेल.
६. यापुढे तुम्हाला प्रवासी अणि त्याच्याशी सबंधित सर्व माहिती भरावी लागेल.
७. त्यानंतर तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास अपडेट करावा लागेल.
८. ही प्रोसेस ज़ली की तुम्ही तुमचा बोर्डिंग पास विमानतळावर शेअर करा.

हेही वाचा : खुशखबर! IPPB ने लॉन्च केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता मोबाईलवरही करता येणार वापर

कोलकाता विमानतळावर डिजीयात्रा अ‍ॅप कसे वापरावे ?

विमानतळावर पोहोचल्यानंतर, सर्वप्रथम कोलकाता विमानतळाच्या गेट क्रमांक 2B आणि 3A वर जा. तेथे तुम्ही डिजी यात्रा App वापरू शकता. यानंतर, App मध्ये तुमच्या डिजीयात्रा ई-गेटवर तुमचा बोर्डिंग पास पटकन स्कॅन करा. यानंतर तुमचा चेहरा कॅमेराकडे दाखवून स्कॅन करा. शेवटी, सिस्टम तुमचा डेटा स्कॅन करेल आणि ई-गेट उघडेल.