Disadvantages of Mobile Back Cover: नवीन स्मार्टफोन खरेदी केला की, प्रत्येकच जण त्या स्मार्टफोनला फार जपतात. या स्मार्टफोनच्या प्रोटेक्शनसाठी अनेक लोक बॅक कव्हर (Phone Back Cover) चा वापर करतात. स्मार्टफोन कव्हरमध्ये देखील आपल्याला डिझायनर किंवा भिन्न पॅटर्न असलेले कव्हर हवे असतात. जरी त्यांचा वापर फोनचे संरक्षणासाठी केला जातो, परंतु हे कव्हरच फोनचे अनेक प्रकारे नुकसान करतात, हे तुम्हाला माहितेय कां? दीर्घकाळापर्यंत स्मार्टफोन कव्हरचा वापर केला तर कव्हरमुळे, तुमच्या फोनमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर जाणून घेऊया फोन कव्हर लावल्याचा काय तोटा असू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅक कव्हरच स्मार्टफोनसाठी ठरु शकतो धोकादायक, ‘हे’ आहेत तोटे

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये रबर कव्हर, हार्ड प्लास्टिक कव्हर इत्यादी वापरत असाल तर ते तुमच्या मोबाईल फोनची उष्णता बाहेर येण्यापासून रोखतात. जेव्हा तुम्ही सतत फोनवर काम करता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की, अनेक वेळा तुमचा मोबाईल गरम होऊ लागतो. अशा परिस्थितीत, जाड मोबाईल कव्हर स्मार्टफोनची कार्यक्षमता कमी करते.

(हे ही वाचा : आर्थिक रसातळाला गेलेल्या पाकिस्तानमध्ये कोणता स्मार्टफोन वापरतात माहितेय कां? जाणून घ्या )

स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे सेन्सर बसवलेले असतात. जर तुम्ही Ipaky कव्हर वापरत असाल तर ते मोबाईल फोनला सर्व बाजूंनी कव्हर करते. याचा पुन्हा मोबाईलच्या सेन्सर्सवर परिणाम होतो आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येऊ शकतात.

जर तुम्ही पारदर्शक किंवा स्पष्ट मोबाईल कव्हर वापरत असाल तर काही दिवसात ते घाण होते आणि तुमचा मोबाईल फोन कुरूप दिसू लागतो.

तसेच जेव्हा तुम्ही मोबाईल फोनवर कव्हर फिट करता, तेव्हा तुम्ही फोन साफ करायला विसरता, त्यामुळे मोबाईलच्या बाजूला आणि मागील पॅनलवर घाण साचत राहते. त्यामुळे स्पीकरच्या ग्रीलमध्ये आणि मागील पॅनलवरील काचेमध्ये घाण साचू लागते आणि मोबाइलचा लूक खराब होऊ लागतो. कधी कधी स्पीकरमधून येणारा आवाजही मंद होतो.

(हे ही वाचा : Samsung Galaxy S23 Series १ फेब्रुवारीला करणार मार्केटमध्ये एंट्री, ‘हे’ असतील तगडे फीचर्स )

स्मार्टफोनसाठी कव्हर खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. म्हणजेच, आधी तुम्ही स्वतःसाठी सर्वात महागडा स्मार्टफोन खरेदी करता आणि नंतर चांगल्या कव्हरसाठी पुन्हा पैसे खर्च करता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काही लोक आयफोनच्या कव्हरसाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च करतात.

स्मार्टफोनसाठी ‘या’ बॅक कव्हरचा वापर करा

जर तुम्हाला तुमच्या मोबाईलला कव्हर लावायचाच असेल तर तुम्ही कव्हर खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की कव्हर खूप पातळ असावे, जेणेकरून मोबाईल फोनच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच आठवड्यातून एकदा मोबाईलचे कव्हर काढून स्मार्टफोन स्वच्छ करावे, त्यामुळे तुमचे स्मार्टफोन सुरक्षित राहील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disadvantages of mobile back cover if you use colorful or designer mobile cover then read these disadvantages pdb
First published on: 31-01-2023 at 18:15 IST