मागच्या वर्षापासून नेटफ्लिक्सने त्यांच्या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली होती. या बंदीमुळे वापरकर्त्यांना कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कुणालाही पासवर्ड शेअर करता येणार नाही, असे घोषित केले होते. हे करण्यामागे कंपनीच्या रेव्हेन्यूला म्हणजेच महसुलीला चालना देणे आणि नेटफ्लिक्सच्या साइन-अपमध्ये वाढ करणे असा हेतू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता नेटफ्लिक्सच्या पावलावर पाऊल टाकत डिजनी प्लसनेदेखील पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या काही महिन्यांतच या पासवर्ड क्रॅकडाउनची प्रक्रिया सुरू होणार आहे असे समजते.

हेही वाचा : Amazfit Active स्मार्टवॉच भारतात लाँच! विकत घेण्याआधी किंमत अन् फीचर जाणून घ्या…

“डिजनी प्लसला जर चुकीच्या अकाउंट शेअरिंगचा संशय आला किंवा व्यक्तीने दुसऱ्याच्या अकाउंटवर साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला स्वतःचे सबस्क्रीप्शन अकाउंट उघडण्याचा पर्याय समोर येईल. हा नियम मार्च २०२४ पासून लागू होईल”, असे डिजनी प्लसचे मुख्य वित्त अधिकारी [chief financial officer ] ह्यू जॉन्स्टन यांनी बुधवारी सांगितल्याची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

मात्र, याबरोबरच अजून एक फीचर डिजनी प्लस घेऊन येत आहे. या फीचरमध्ये नेटफ्लिक्सने केलेल्या युक्तीप्रमाणेच, कुटुंबातील एखादी व्यक्ती वेगळ्या घरात राहत असले तर त्यांना ॲड करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरून ॲड करून घेता येऊ शकते.

“आमच्याकडे उत्तम प्रतीचा, दर्जेदार कॉन्टेन्ट आहे याची आम्हाला खात्री आहे, त्यामुळे त्याचा आनंद जास्तीत-जास्त लोकांनी घ्यावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे या नवीन फीचरसह आमच्या ग्राहकांची वाढती संख्या पाहण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत”, असे जॉन्स्टन यांचे म्हणणे आहे.

एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त, दुसऱ्या घरात राहणाऱ्या व्यक्तीबरोबर पासवर्ड शेअरिंगवर बंदी करण्याचा नियम डिजनी प्लसने खरंतर या वर्षापासूनच लागू केला आहे. म्हणजे, हे नवीन नियम २५ जानेवारीपासून नव्या ग्राहकांसाठी लागू केले आहेत. तर डिजनी प्लसच्या जुन्या ग्राहकांसाठी १४ मार्चपासून हे नियम लागू होणार आहेत असे समजते.

हेही वाचा : केवळ ‘आवाजावर’ लिहिले जाणार E-mail? Draft with voice फीचर नेमके कसे काम करू शकते, जाणून घ्या….

“पेड शेअरिंग हा पर्याय आमच्यासाठी खरंच फायद्याचा ठरणार आहे. कारण आमचे स्पर्धक, इतकेच नाही तर स्क्रीन समोर बसणारी व्यक्तीदेखील आमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही काही विशिष्ट गोष्टी करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे जॉन्स्टन यांनी म्हटले आहे.

खरंतर असे काही करण्यामागे रेव्हेन्यूला चालना देणे हे एक कारण झालेच. मात्र, पासवर्ड शेअरिंगमुळे नेटफ्लिक्स, डिजनी प्लस यांसारख्या कंपन्यांना चांगलाच फटका बसत होता. कारण अनेक व्यक्तींसह पासवर्ड शेअर करणे म्हणजे, सबस्कायबर्सची संख्या कमी; परिणामी कंपनीला पैसे मिळण्याचे प्रमाणदेखील कमी, असे साधे गणित आहे.

म्हणूनच पासवर्ड शेअरिंग बंद करून ग्राहकांकडून महसूल गोळा करण्याची युक्ती वापरण्यात आली आहे. याचा चांगलाच फायदा नेटफ्लिक्स या कंपनीला झाल्याचे दिसते. कारण पासवर्ड शेअरिंग बंद केल्यापासून नेटफ्लिक्सचे तब्ब्ल नऊ मिलियन इतके सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disney plus to stop password sharing from from march and will also introduce a new feature check out dha
First published on: 09-02-2024 at 22:37 IST