भारतात मोबाईलची मागणी प्रचंड वाढली आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर मोठ्या सूटसह ग्राहकांना दमदार फीचर देणारे फोन देण्यासाठी ईकॉमर्स कंपन्यांनीही आपली सेल सुरू केली आहे. दरम्यान वन प्लसने देखील यात उडी घेत दिवाळी सेलसाठी आपला प्रिमियम फोन OnePlus 10 Pro 5G वर मोठी सूट दिली आहे.

इतकी मिळतेय सूट

byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
penalty for car washes in bangalore
तहानलेल्या बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड
home loan from bank of india marathi news, bank of india home loan marathi news, bank loan cheaper marathi news
बँक ऑफ इंडियाकडून घरांसाठी कर्ज स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ; सवलतीतील ८.३ टक्के व्याजदराचा लाभ मात्र ३१ मार्चपर्यंतच!

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या वनप्लस १० प्रो ५ जी या फोनची मूळ किंमत ६६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र सूट दिल्यानंतर फोनची किंमत ६१ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. कंपनीकडून किंमतीमध्ये ५ हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांची अधिक बचत व्हावी यासाठी काही ऑफर देखील दिले आहेत.

(रोबोटने केवळ इतक्या सेकंदात पार केले १०० मीटर अंतर, गिनीज बूकमध्ये नोंद, पाहा व्हिडिओ)

ही आहे ऑफर

कंपनीने फोनची किंमत ५ हजार रुपयांनी घटवली आहे. तसेच ऑफर देखिल दिला आहे. फोन खरेदीसाठी जर तुम्ही अ‍ॅक्सिस बँकचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला ६ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. म्हणजे एकूण ६६ हजार ९९९ रुपयांच्या ५ जी फोनवर तुम्हाला ११ हजार रुपयांची मोटी सूट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला ५५ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. पण हा ऑफर केवळ ३० सप्टेंबर पर्यंतच आहे.

काय आहेत फीचर?

वनप्लस १० प्रोमध्ये कंपनी ३२१६x१४४० पिक्सेल रेझोल्युशनसह ६.७ इंचचा क्यूएचडी प्लस अमोलेड डिस्प्ले देत आहे. फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज पर्यायासह येतो. जलद आणि चांगल्या कामगिरीसाठी फोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेट देण्यात आला आहे.

(व्हिवोने लाँच केला ‘हा’ 5 G फोल्डेबल फोन, सॅमसंगला तगडे आव्हान, जाणून घ्या किंमत)

सुंदर छायाचित्र काढण्यासाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. प्रमुख कॅमेरा हा ४८ मेगापिक्सेलचा आहे. त्यानंतर ८ मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा गुणवत्तापूर्ण छायाचित्र निघण्यासाठी देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन बराच काळ चालावा, काम करताना व्यत्यत येऊ नये यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह हा फोन अँड्रॉइड १२ वर आधारित कलर ओएस १२.१ वर काम करतो. फोन ८० वॉट फास्ट आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंगसह उपलब्ध आहे.