देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी सार्वजनिक चार्जिंग स्टेशनमध्ये मोबाईल फोन चार्ज न करण्याचा सल्ला दिला आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंगमुळे फोनमध्ये मालवेअर बसण्याचा धोका असल्याचे ओडिशा पोलिसांचे म्हणणे आहे. ओडिशा पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर आधुनिक गॅजेट्सद्वारे मोबाईल फोन चोरीला जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि त्यामुळेच ओडिशा पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी हा सल्ला दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे मोबाइल चार्ज केल्यानंतर हैदराबादमधील एका कंपनीच्या सीईओच्या खात्यातून तब्बल १६ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘ज्यूस जॅकिंग’च्या माध्यमातून मोबाईलमधून अशी चोरी शक्य असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सायबर फसवणूक करणारे सार्वजनिक यूएसबी चार्जिंग स्टेशनमध्ये मालवेअर लोड करू शकतात जेणेकरून चार्जिंग दरम्यान त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रवेश मिळू शकेल.

त्यामुळे ओडिशा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल फोन चार्जिंग करु नका, असे आवाहन केले आहे. तुमच्यासोबतही असा प्रकार होऊ शकतो. वेळेआधीच सावध होत अशा घटना टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

आणखी वाचा : अन् ‘या’ कारणामुळे फेसबुकने केली १,६०० बनावट खाती बंद; जाणून घ्या नेमकं प्रकरण…

ज्यूस जॅकिंग किती धोकादायक?

हा एक प्रकारचा सायबर किंवा व्हायरस हल्ला आहे. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टॅंड किंवा माॅल अशा सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणा-या यूएसबी चार्जिंग पोर्टद्वारे गुन्हेगार कोणत्याही मोबाइल, लॅपटाॅप, टॅब्लेट, किंवा अन्य उपकरणात मालवेअर बसवून वैयक्तिक डेटा चोरतात. या प्रक्रियेला ज्यूस जॅकिंग म्हणतात.

अशी होते चोरी

  • चार्जिंग पाॅइंट दोन प्रकारचे असतात.
  • एक एसी पाॅवर साॅकेट आणि यूएसबी चार्जिंग पाॅइंट.
  • यूएसबी चार्जिंग पाॅइंटमध्ये थेट यूएसबी केबल लावून मोबाइल चार्ज करता येतो.
  • यात यूएसबीतून डेटाही ट्रान्सफर होतो. यातून डेटा चोरीही होऊ शकतो.
  • जेव्हा आपण यापासून मोबाइल चार्ज करत असतो त्यावेळी मोबाइलमधून डेटा हॅकर्सकडे थेट ट्रान्सफर होतो.
  • यात आपल्या बॅंक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

 लक्षात ठेवा

एसी पाॅवर साॅकेटद्वारे डेटा ट्रान्सफर किंवा चोरीची समस्या नाही. चार्जद्वारे तुमच्या मोबाइलसोबत डेटा कम्युनिकेशन करता येत नाही, मात्र थेट यूएसबी ते यूएसबीद्वारे डेटा ट्रान्सफर करता येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not charge mobile in public places pdb
First published on: 28-09-2022 at 13:32 IST