Do Not Keep This Electronic Items : नवीन उपकरणे घेतल्यानंतर लोक जुनी उपकरणे जसे फोन, राऊटर्स इत्यादी वस्तू एकतर विकून टाकतात किंवा घरीच ठेवतात. ही उपकरणे दीर्घकाळ ठेवल्यास धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ही उपकरणे घरातून काढून टाकली पाहिजेत. कोणती आहेत ही उपकरणे? जाणून घेऊया.

१) जुने राऊटर्स

Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
How many times we should boil milk know Correct Way To Boil Milk
Milk Boiling Tips: दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळा उकळावे, जाणून घ्या
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Kitchen Jugaad To Avoid Potatoes Sprout Or Batata Turning Green Bad
बटाट्याला कोंब येऊ नये, बटाटा हिरवा पडू नये म्हणून घरी आणताच करा हा सोपा उपाय; पैसे व आरोग्य दोन्ही वाचवा

जुने राऊटर्स तुमच्यासाठी समस्या उभी करू शकतात. जुन्या मॉडेलचा वापर असुरक्षित ठरू शकतो. नवीनतम सुरक्षा मानक WPA-3 आहे जे २०१८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. तुमच्या राऊटरमध्ये WPA-3 किंवा कमीत कमी WPA2-PSK AES सिक्युरिटी सपोर्ट नसेल तर त्यास तातडीने बदला. नवीन राऊटर तुम्हाला सुरक्षित कनेक्शन देईल आणि इंटरनेटची गती देखील वाढवण्यात मदत करेल.

(Christmas 2022 : ख्रिसमसचा आनंद आणखी वाढवतील हे बजेट फ्रेंडली Gadgets, प्रियजनांना द्या गिफ्ट)

२) जुने फोन्स

नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर जुना स्मार्टफोन लोक घरात ठेवतात किंवा वापर नसल्याने तो घरात पडून असतो. दीर्घकाळ घरात असणारे असे फोन्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. बॅटरी फुलने ही एक गंभीर समस्या आहे, जी ठराविक वेळेनंतर अनेक जुन्या फोनमध्ये दिसून येते. बॅटरीमध्ये स्फोट होऊ शकतो. तुमच्याकडे वापरात नसलेला फोन असल्यास तुम्ही त्यास एक्सचेंज करू शकता किंवा रिसायकलसाठी देऊ शकता. जुने फोन वापरणे प्रायव्हसीसाठी देखील धोकादायक ठरू शकते.

३) एक्सटेंशन बोर्ड

तुमच्या घरात दीर्घकाळ वापरात असलेले एक्सटेंशन बोर्डही धोक्याचे ठरू शकते. अशा बोर्डचा वापर केल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकतो. म्हणून जुना एक्सटेंशन बोर्ड वापरण्याऐवजी नवीन खरेदी करा.