जेव्हाही आपल्या एखाद्या विशिष्ट अवयवामध्ये समस्या जाणवते तेव्हा डॉक्टर आपल्याला एक्स-रे काढण्याचा सल्ला देतात. एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टर पुढील वैद्यकीय उपचार सुरु करतात. एक्स-रे मशीनची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की डॉक्टर कोणत्याही प्रकारच्या दुखापतीचे किंवा आजाराचे योग्य मूल्यांकन करू शकतील. कोणत्याही प्रकारच्या समस्येचे मूल्यांकन करण्यासाठी, डॉक्टर प्रथम एक्स-रे करून घेण्याचा सल्ला देतात. परंतु तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का की पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीचा एक्स-रे काढला गेला असेल किंवा पहिल्यांदा शरीराच्या कोणत्या भागाचा एक्स-रे काढला गेला असेल? जर तुम्हाला हे माहित नसेल तर आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

एक्स-रे म्हणजेच क्ष-किरणांचा शोध ब्रिटनचे वैज्ञानिक विल्हेल्म रोएंटजेन यांनी १८९५ साली लावला. तथापि, एक्स-रे मशीनची औपचारिक सुरुवात १८ जानेवारी १८९६ साली झाली. एच. एल. स्मिथ यांनी एक्स-रे मशीन सादर केली. क्ष-किरण ही आरोग्य विश्वातील सर्वात मोठी क्रांती ठरली. यामुळे रोग ओळखणे सोपे झाले. विल्हेल्म रोएंटजेन यांच्यामुळेच आज आपण आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव स्पष्टपणे पाहू शकतो.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
solar waste in india
चिंताजनक अहवाल, २०३० पर्यंत भारतातील सौर कचऱ्यात होणार तब्बल २० पटींनी वाढ

National Science Day 2022 : ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ २८ फेब्रुवारी रोजीच साजरा होण्यामागे आहे ‘हे’ खास कारण

कॅथोड रेडिएशनचा प्रयोग करताना विल्हेल्म रोएंटजेन यांनी एक्स-रेचा शोध लावला. जेव्हा ते संशोधन करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की क्ष-किरण मानवी ऊतींच्या पार जातात आणि त्यामुळे हाडे दिसतात. विल्हेल्म रोएंटजेन यांनी त्यांच्या पत्नी बर्थाच्या हातावर पहिला एक्स-रे काढला. एका अहवालानुसार, आज जगात दर सेकंदाला १०० पेक्षा जास्त, तर एका वर्षात ४ अब्ज पेक्षा जास्त एक्स-रे काढले जातात.