BSNL 4G Launch: बीएसएनएलने TCS (Tata Consultancy Services) सोबत भागीदारी केली आहे, ज्यानंतर सरकारी दूरसंचार कंपनी आपल्या चौथी जनरेशन सेवा म्हणजेच ४जी सेवा लवकरच सुरू करण्यास तयार आहे. मात्र, कंपनीने भारतात ४जी लॉन्च करण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण, २०२४ पर्यंत ते अधिकृतपणे सादर केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, बीएसएनएलचे ४जी नेटवर्क कार्यान्वित झाल्यास, ग्राहकांना त्यांचे नियमित सिम ४जी सक्षम मॉडेलमध्ये अपग्रेड करावे लागेल. हे पाहता, तुमचे बीएसएनएल सिम ४जी ला सपोर्ट करणार की नाही हे तपासण्याचे मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमचे BSNL सिम 4G LTE सपोर्ट आहे की नाही हे कसे तपासायचे?

बीएसएनएलने अद्याप देशभरात ४जी LTE नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणणे बाकी आहे आणि अहवाल सूचित करतात की ते २०२४ पर्यंत ते उपलब्ध होऊ शकते. त्याच वेळी, ४जी नेटवर्क पूर्ण झाल्यावर, ग्राहकांना त्यांचे सिम ४जी आवृत्तीमध्ये अपग्रेड करावे लागेल. तर तुमचे विद्यमान बीएसएनएल सिम ४जी नेटवर्कला सपोर्ट करते की नाही हे तपासायचे असेल तर तुम्ही ते कसे तपासू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.ते येथे आहे. सध्या ही प्रक्रिया केवळ केरळमधील तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, कोझिकोड आणि कन्नूरमध्ये लागू आहे.

( हे ही वाचा: Vodafone Idea 5G Launch: जाणून घ्या Vi 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील)

  • तुमचे BSNL सिम 4G सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला एका नंबरवर कॉल करावा लागेल.
  • सामान्य कॉल म्हणून टोल फ्री नंबर ‘९४९७९७९७९७’ डायल करा.
  • ४जी सेवांसाठी सिमची ४जी तयारी एसएमएसद्वारे सुरू केली जाईल.
  • जर सध्याचे सिम ४जी सक्षम नसेल, तर ग्राहक ४जी सिममध्ये विनामूल्य अपग्रेड मिळविण्यासाठी जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र किंवा ऑफलाइन स्टोअरला भेट देऊ शकतात.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does your bsnl sim support 4g network or not check it out like this gps
First published on: 25-08-2022 at 17:36 IST